प्रतिनिधी
मुंबई : खतासाठी जात पाहू नका, अशा मुख्यमंत्र्यांनी सक्त सूचना दिल्या आहेत!! शेतकऱ्यांना खत मिळवण्यासाठी जो फॉर्म भरायचा त्यामध्ये जातीचा कॉलम असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याविषयी विधानसभेत विरोधी आमदारांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो जातीचा कॉलम फॉर्म मधून काढून टाकण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना खत देताना जात पाहू नका, असे सक्त आदेश कृषी खात्याला दिले आहेत. Don’t ask farmers caste for fertiliser, chief minister eknath shinde clarified in maharashtra legislative assembly
खतासाठी जात विचारण्याचा गंभीर प्रकार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्र सरकारला यासंदर्भात जातीचा रकाना वगळण्याच्या सूचना केल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्याला खत देताना जात विचारण्यात येत होती. यावरुन शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अनेक आमदारांनी या मुद्द्यावरून विधानसभेत सरकारला जाब विचारला.
– सतेज पाटलांचा इशारा
खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगणे बंधनकारक केल्याच्या काही बातम्या मीडियाने दाखविल्या त्यामुळे त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. माजी मंत्री सतेज पाटील यांनी सरकारला यावरून गंभीर इशारा दिला. शेतकऱ्यांना जात का विचारली जातेय?,निवडणुकीत याचा वापर केला जाणार आहे का?, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
खत घेताना जात विचारण्याचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर चौकशी करणार असल्याची प्रतिक्रिया सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडेंनी दिली, तर शेतकऱ्यांना जात विचारली जात असेल तर ते चुकीचे असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनीही स्पष्ट केले. एससी, एसटीसाठी काही योजना असेल तर जात विचारली गेली असेल. मात्र जात विचारून खत देणं चूकच आहे, असे भाजप आमदार संजय कुटे यांनी सांगितले.
विरोधकांकडून सरकारचा समाचार
दरम्यान, जातीच्या रकान्यात हिंदुस्थान म्हणून लिहू शकतात, असा सल्ला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला, तर प्रत्येक गोष्टीत जात विचारली जाणार असेल तर सरकारला जनताही महाराष्ट्र धर्म दाखवेल असे टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी सोडले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही खतासाठी शेतकरी बांधवांना जात सांगावी लागणं हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे. अजून कोणाकोणाला जात विचारणार आहे हे सरकार, असा सवाल अंबादास दानवेंनी केला. शेतकऱ्याला जात विचारणं चुकीचं, दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
मात्र या सगळ्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खतासाठी जात विचारली जाणार नाही. तो कॉलम काढून टाकण्याच्या सूचना केंद्र सरकारला दिले आहेत, अशी माहिती विधानसभेत दिली.
Don’t ask farmers caste for fertiliser, chief minister eknath shinde clarified in maharashtra legislative assembly
महत्वाच्या बातम्या
- स्वयंघोषित काँग्रेस युवराजाने सर्व मर्यादा ओलांडल्या!, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार
- ओवैसींना बी टीम म्हणून हिणवताना पवारच बनलेत का भाजपची बी टीम??
- रामचंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती; १७ वेळा पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत झाले आहेत पराभूत
- उद्धव ठाकरे यांना बजेटवर बोलायला लावून अजितदादांनी कुणाला मारला डोळा??