• Download App
    Dombivli Land Fraud Revenue Minister Bawankule Forged Signature OSD Letter Used Case Filed जमीन नोंदीसाठी महसूल मंत्र्यांच्या सही - शिक्क्याचा गैरवापर,

    Dombivli : जमीन नोंदीसाठी महसूल मंत्र्यांच्या सही – शिक्क्याचा गैरवापर, महसूल विभागाच्या विशेष कार्य अधिकाऱ्याचेही बनावट पत्र, गुन्हा दाखल

    Dombivli

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Dombivli जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातील महसूल दप्तरी नोंद करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने थेट राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला. मंत्रालयातील महसूल विभागाच्या एका विशेष कार्य अधिकाऱ्याचेही बनावट पत्र वापरून हा आदेश काढण्यात आला होता. तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार समोर आला असून या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केला आहे.Dombivli

    अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

    महसूलमंत्री कार्यालयात केलेल्या चौकशीत, तो आदेश महसूलमंत्री बावनकुळे आणि त्यांचे विशेष कार्य अधिकारी कुंदनकुमार सोनवणे यांच्या बनावट सही आणि शिक्क्याने काढल्याचे उघडकीस आले. या आदेशाचा क्रमांक महसूलमंत्री कार्यालयातील नोंदीशी जुळत नसल्याचेही स्पष्ट झाले. महसूलमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार, ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने या बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कल्याणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार महसूल विभागाचे सहायक लक्ष्मण नांगरे यांनी आधी रामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.Dombivli



    मात्र, हे प्रकरण पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयजवळील जमिनीशी संबंधित असल्याने पुढील चौकशीसाठी ते विष्णुनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. महसूल विभागाच्या सर्वोच्च स्तरावरील व्यक्तींच्या सही-शिक्क्याचा गैरवापर झाल्याने यामागील सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

    यापूर्वी देखील अशीच अनेक प्रकरणे समोर आली आहेत. राज्यातील काही कार्यालयात बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचेही समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. गेल्यावर्षीही एका मंत्र्यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली होती. त्याची राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    काय आहे प्रकरण?

    महसुली गाव असलेल्या मौजे आयरेशी संबंधित पश्चिमेकडील कोपर रोडवरील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या सर्व्हे नं. ३४/५, ३९/११, ४०/१, ८६/२ या जमिनीच्या मालकी हक्कावरून महसूल विभागाकडे दावे दाखल आहेत. हे प्रकरण सध्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहे. प्रकरणातील अर्जदारांना नुकताच या जमिनीबाबत एक आदेश काढल्याची माहिती मिळाली. सुनावणी प्रलंबित असताना आदेश कुणी काढला, असा संशय अर्जदाराला आला. त्यांनी तत्काळ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात तक्रार केली.

    पोलिसांकडून तपास सुरू

    उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर म्हणाले की, सदर प्रकरणात तत्कालीन उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त, कोकण भवन यांच्यासमोर सुनावणी होऊन अंतिम निर्णय पारित झाला आहे. या निर्णयाविरुद्ध महसूलमंत्री महोदयांकडे अपील दाखल करण्यात आले असून त्या अपिलाची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. मंत्र्यांच्या बनावट सहीचा वापर करून खोटा आदेश तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आली. याबाबत मंत्रिमहोदय व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

    Dombivli Land Fraud Revenue Minister Bawankule Forged Signature OSD Letter Used Case Filed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अशोक चव्हाणांच्या जिल्ह्यावर अजितदादांचा डोळा; संपूर्ण नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचा संकल्प!!

    Shirdi Sai Baba : शिर्डीत 4 दिवसांत 7 लाख भाविक साईचरणी, नवीन दर्शनरांगेत 4 तासांत दर्शन, गतवर्षीपेक्षा 2 लाख गर्दी जास्त

    पुण्यात महायुतीतले संबंध खारट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा धंगेकरांना निरोप, महायुतीत मिठाचा खडा पडता कामा नये; पण धंगेकर कुणाचे ऐकणार??