Monday, 12 May 2025
  • Download App
    भ्रष्ट नेत्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का?; भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा शरद पवार यांना संतप्त सवाल Do you guide corrupt leaders ?; BJP leader Kirit Somaiya's angry question to Sharad Pawar

    भ्रष्ट नेत्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का?; भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा शरद पवार यांना संतप्त सवाल

    वृत्तसंस्था

    पुणे : भ्रष्ट नेत्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का?; असा संतप्त सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला आहे.
    Do you guide corrupt leaders ?; BJP leader Kirit Somaiya’s angry question to Sharad Pawar

    पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन कारवाई केल्यावर किंवा आरोप झालेल्या नेत्यांना शरद पवार पाठीशी घालत आले आहेत. तसेच त्यांना निर्दोष असल्याचे सर्टिफिकेट देत आले आहेत. एखाद्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीने कारवाई केली की, ते म्हणतात, ईडी अतिक्रमण करतंय, ईडी हैराण करतंय. भावना गवळी निर्दोष आहे.



    माझा पवार साहेबांना प्रश्न असा आहे. खासदार भावना गवळींनी एकूण २५ कोटी रुपयांची कॅश काढली आणि शरद पवार सांगतात ईडी का चौकशी करतंय? ईडीचा कायदा तुम्हीच केला होता तुम्ही मंत्री असताना. मुद्दा कोण चौकशी करतं हा नाही. पण, भावना गवळींनी ५५ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, ५५ कोटी रुपये ढापले आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणारा कारखाना त्यांनी त्यांच्याच कंपनीला २५ लाखात कारखाना विकला. तुम्हाला हे ५५ कोटी दिसत नाहीत का? की आपणच ठाकरे सरकारला मार्गदर्शन करता का ? असा सवालही सोमय्या यांनी शरद पवारांना विचारला आहे.

    किरीट सोमय्या म्हणाले, अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता मी तिसऱ्या अनिलच्या शोधात पुण्यात आलो आहे. ते म्हणाले, भ्रष्टाचार कऱण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना शरद पवार तुम्ही मार्गदर्शन करता का?

    Do you guide corrupt leaders ?; BJP leader Kirit Somaiya’s angry question to Sharad Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!