• Download App
    Chief Minister जिथे संपादन होणार, तिथल्या जमिनी विकू नका,

    Chief Minister : जिथे संपादन होणार, तिथल्या जमिनी विकू नका, दलालांच्या भानगडीत पडू नका; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

    Chief Minister

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : Chief Minister  जिथे जमिनीचे संपादन होणार आहे, तेथील शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडले नाही पाहिजे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले. कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर हा जमीन का घेतोय याची माहिती घ्या. कारण जमिनीचा पैसा हा थेट शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे, अशी आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.Chief Minister

    अमरावती येथील विमानतळाच्या लोकार्पणानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्यांसाठी नोकरीतील आरक्षण 5 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा फेरविचार करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना भावनिक साद घातली.



    नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

    आम्ही जमीन अधिग्रहणाची घोषणा केली की कोणीतरी धन्नाशेठ येतो आणि शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतो. त्यानंतर, 5 पटीने तेथे पैसे कमावतो. त्यामुळे, ज्याठिकाणी जमिनीचे अधिग्रहण होतेय, त्याठिकाणी तुम्ही जमिनी विकू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडले नाही पाहिजे. कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय, तर हा जमीन का घेतोय, याची माहिती घ्या. कारण, शेतकऱ्यांना पैसे मिळावे, व्यापाऱ्यांना नको, अशी आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    कोणत्याही दलालाच्या फंदात पडू नका

    आम्ही असा कायदा केला आहे की, जमिनी संपादनावेळी शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळाला पाहिजे. 2006 ते 2013 मधील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत ही योजना सुरू राहील, ती बंद होणार नाही. काही अडचण आल्यास आमदार आणि मंत्र्यांशी संपर्क साधावा, कोणत्याही दलालाच्या फंदात पडू नये, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    2006 ते 2013 काळात शेतकऱ्यांची फसवणूक झाली

    विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची संधी मला तुमच्या आशीवार्दाने मिळाली. सन 2006 ते 2013 च्या काळात येथील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. सर्व प्रकारचे हक्क गोठवण्याचे काम झाले, कोणाला एक लाखाचा भाव देऊन हक्क गोठवण्याचे काम झाले. मग मी मुख्यमंत्री झालो तेव्हा नवीन जीआर काढला आणि थेट खरेदी सुरू केली. मग अनेकांना कळले की, आमची फसवणूक झाली आहे. सुरुवातीच्या काळात अनेक बैठका झाल्या, त्या लोकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. मग, युतीचे सरकार आले तेव्हा अनेक आंदोलनही झाले, काही आत्महत्याही झाल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    2006 ते 2013 या काळात थेट पद्धतीने शासनाला जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना 832 कोटी रुपयांच्या वाढीव मोबदल्याचे वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 5 लाख रुपये मिळणार असून ही रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल.

    विदर्भ बळीराजा संघर्ष समितीच्या लढ्याला यश

    जिल्ह्यातील निम्म पेढी, विश्रोळी, उर्ध्व वर्धा या धरणांसह अनेक प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या होत्या. पुरेसा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी विदर्भ बळीराजा संघर्ष समितीच्या माध्यमातून आपला लढा सुरू केला होता. या लढ्याला आता यश मिळाले आहे.

    Do not sell the land where acquisition will take place, do not get involved with brokers; Chief Minister’s emotional appeal to farmers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस