• Download App
    Girish Mahajan राईचा पर्वत करू नका, सरसकट झाडे तोडत नाही तर एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे :

    Girish Mahajan : राईचा पर्वत करू नका, सरसकट झाडे तोडत नाही तर एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे : गिरीश महाजन यांचे आवाहन

    Girish Mahajan

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : Girish Mahajan  आम्ही सरसकट झाडे तोडत नाही, तर एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणार आहोत. त्यामुळे या विषयाचा उगीच राईचा पर्वत करू नका,” असे आवाहन राज्याचे मंत्री आणि कुंभमेळा कामांचे प्रभारी गिरीश महाजन यांनी केले आहे.Girish Mahajan

    आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन परिसरात साधूग्राम उभारणीसाठी प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा गाजत आहे. यावरून पर्यावरणप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच, राज्याचे मंत्री आणि कुंभमेळा कामांचे प्रभारी गिरीश महाजन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.Girish Mahajan



    सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन भागात साधूग्राम उभारले जाणार आहे. ही जागा साधूग्रामसाठी आरक्षित असली तरी तिथे सध्या अनेक झाडे आहेत. ही झाडे तोडण्यास वृक्षप्रेमींनी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही यावर संताप व्यक्त करत, “गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात, उत्तर द्या. आपली काही दुश्मनी नाही, पण झाडे तुटता कामा नयेत,” असे म्हटले होते.

    गिरीश महाजन म्हणाले, तपोवनातील ही जागा साधूग्रामसाठी आरक्षित आहे. कुंभमेळा 12 वर्षांतून एकदा येतो. ही जागा आम्ही कोणाच्या घशात घालत नाही किंवा तिथे झाडे तोडून रेस्टॉरंट बांधणार नाही. त्यामुळे या विषयाचा बाऊ करू नये. सरकार वृक्षतोडीच्या बाजूने नाही, आम्ही सुद्धा वृक्षप्रेमीच आहोत. काही झाडे काढावी लागणार आहेत, हे सत्य आहे. मात्र, आम्ही 1 हजार झाडे काढणार असू तर त्या बदल्यात १५ हजार झाडे लावणार आहोत. हैदराबादवरून ही झाडे आणली जाणार आहेत. झाडे लावण्याचे काम आधी सुरू झाले आहे. आम्ही लावणार असलेल्या झाडांमुळे उलट जंगल वाढणार आहे.

    अभिनेते सयाजी शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना महाजन म्हणाले, “सयाजी शिंदे यांचे समाधान झाल्यानंतर आम्ही झाडे लावू. आम्ही असे म्हणत नाही आहोत, की आम्ही लावून टाकू, करून टाकू, आम्ही आधी लावू मग तुम्ही आम्हाला सांगा, काय करायचे?”

    Do Not Make a Mountain Out of a Molehill, We Cut One Tree and Plant Ten, Says Girish Mahajan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chandrashekhar Bawankule : लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतरच द्या; काँग्रेसच्या पत्रावर बावनकुळे संतापले, ‘विष कालवणारी विचारधारा’ म्हणत डागली तोफ

    CM Fadnavis : धारावी कोणा खासगी व्यक्तीला दिली नाही, प्रत्येक धारावीकराला घर मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Rashmi Shukla : फडणवीस-शिंदेंना खाेट्या गुन्ह्यात गाेवण्याचा हाेता कट, रश्मी शुक्ला यांचा अहवाल बाॅम्ब