• Download App
    गडचिरोलीत पोलीस, जवानांबरोबर आणि वर्षा बंगल्यावर शेतकरी बांधवांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिवाळीDiwali of Chief Minister Eknath Shinde with farmer brothers at Barsha Bungalow

    गडचिरोलीत पोलीस, जवानांबरोबर आणि वर्षा बंगल्यावर शेतकरी बांधवांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिवाळी

    प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी दिवाळीचा आज अनोखा दिवस ठरला. त्यांनी सकाळी गडचिरोलीत नक्षलवादी भागात जाऊन पोलीस, सीआरपीएफचे जवान आणि आदिवासी बांधवांबरोबर दिवाळी साजरी केली, तर सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगल्यावर शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. वर्षा बंगल्यावर यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी दांपत्याला खास निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले होते. प्रत्येक जिल्ह्यातून तीन-चार दांपत्ये शेतकरी दांपत्ये उपस्थित होती. Diwali of Chief Minister Eknath Shinde with farmer brothers at Barsha Bungalow

    गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज करण्यात आले. तसेच या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांच्या सोबत मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली.

    गडचिरोली जिल्ह्यात काम करणारे पोलीस हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावत असतात. आजच्या दिवशी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची भावना याप्रसंगी व्यक्त केली. येथील जवान अतिशय चोखपणे आपले कर्तव्य बजावत असून नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी यासमयी व्यक्त केले.

    याप्रसंगी पोलीस जवानांचे कुटुंबीय आणि स्थानिक आदिवासी बांधवांना फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक कार्यक्रमांचा आनंद घेतला.

    राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.

    वर्षा बंगल्यावरील कार्यक्रमात कृषिमंत्री अब्दुल सत्तार, भाजपचे विधान परिषदेतले नेते प्रवीण दरेकर, माजी केंद्रीय मंत्री अनेक माजी खासदार आनंदराव अडसूळ हे उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली यांनी शेतकरी बांधवांचे औक्षण केले. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक शेतकरी दांपत्याला दिवाळी भेटवस्तू दिली.

    Diwali of Chief Minister Eknath Shinde with farmer brothers at Barsha Bungalow

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!