• Download App
    उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी; भाविकांना प्रवेश नाही जिल्हाधिकाऱ्यांचा गर्दी टाळण्यासाठी निर्णय|District closure in Osmanabad; Devotees have no access

    WATCH : उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी; भाविकांना प्रवेश नाही जिल्हाधिकाऱ्यांचा गर्दी टाळण्यासाठी निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : कोजागिरी पौर्णिमा काळात ३ दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी केले आहे. कोजागिरी पौर्णिमा काळात ३ दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे.District closure in Osmanabad; Devotees have no access

    या काळात तुळजापूर शहरात संचारबंदी आदेश लागू आहे.पौर्णिमाला महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातुन नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या ३ दिवसात एकही वाहन किंवा भाविक जिल्ह्यात येऊ दिला जाणार नाही.



    पोर्णिमेच्या आगोदर एक दिवस पोर्णिमेदिवशी व पोर्णिमेनंतर एक दिवस, असे तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमाबंदी लागू असणार आहे .या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलिस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे. त्यानुसार तुळजापूर शहरात व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

    • उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी; भाविकांना प्रवेश नाही
    •  कोजागिरी पौर्णिमेला दर्शनासाठी भाविक येतात
    • गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी, जिल्हाबंदीचे आदेश
    •  तुळजापुर शहरामध्ये संचारबंदी लागू आहे
    • उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सीमाबंदी लागू केली
    • कडक पोलिस बंदोबस्त लागू केला आहे

    District closure in Osmanabad; Devotees have no access

    Related posts

    100 वर्षांत महाराष्ट्र विधानपरिषदेने नेमके केले काय??, वाचा परंपरा, चर्चा आणि निर्णयांच्या वारशाचा इतिहास!!

    बार्टी, सारथी, महाज्योती योजनांचे लाभ एकाच कुटुंबातल्या एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाल्याच्या तक्रारी; अजित पवारांनी घेतली दखल

    Sudhir Mungantiwar, : मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा- सुधीर मुनगंटीवार संतापले, घरकूल निधीवरूनही रोष