• Download App
    झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं कोण करणार??; मोदींच्या कार्यक्रमावरून पवारांवर I.N.D.I.A आघाडीतल्या नेत्याचा प्रहार|Disquiet in Opposition over Sharad Pawar sharing stage with PM Modi

    झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं कोण करणार??; मोदींच्या कार्यक्रमावरून पवारांवर I.N.D.I.A आघाडीतल्या नेत्याचा प्रहार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : 1 ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक पुरस्काराचा कार्यक्रम जसा जवळ येतो आहे, तसा राजकीय फड रंगू लागला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहण्याचे नियोजन आहे. मात्र या पार्श्वभूमीवर विरोधी I.N.D.I.A आघाडीत प्रचंड अस्वस्थता पसरली असून शरद पवार हे नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने त्यांच्याविषयी I.N.D.I.A आघाडीतील अतिवरिष्ठ नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळेच त्या आघाडीच्या एका बड्या नेत्याने पवारांना उद्देशून झोपलेल्या जागं करता येऊ शकतं, पण झोपेचे सोंग घेतलेल्या जागं कसं करणार??, अशा कठोर शब्दांत प्रहार केला आहे.Disquiet in Opposition over Sharad Pawar sharing stage with PM Modi



    I.N.D.I.A आघाडीतल्या नेत्यांची काल राजधानी दिल्लीत बैठक पार पडली. त्या संदर्भातली बातमी “द हिंदू” या इंग्रजी दैनिकाने दिली आहे. त्यामध्ये पवारांना झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं कसं करणार??, असा टोला एका बड्या नेत्याने लगावल्याचे नमूद केले आहे. पवार मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने त्यांच्याशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा अन्य कोणत्याही वरिष्ठ नेत्याने थेट बोलावे आणि त्यांना कार्यक्रमाला जाण्यापासून परावृत्त करावे, अशी सूचना एका नेत्याने केली. पण त्यावर लगेच झोपलेल्या जागं करता येऊ शकतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या जागं कसं करणार??, असे उद्गार एका बड्या नेत्याने काढले.

    अर्थात या बैठकीला स्वतः पवार उपस्थित नव्हते, पण त्यांच्या गटाच्या खासदार वंदना चव्हाण या मात्र या बैठकीत हजर होत्या. पण वंदना चव्हाण यांनी मात्र त्या कठोर प्रहारावर कोणतेही उत्तर दिले नसल्याचेही त्या बातमीत नमूद केले आहे.

    पवारांविषयी दाट संशय

    पण एकूणच शरद पवारांच्या राजकीय भूमिकेविषयी I.N.D.I.A आघाडीत संशयाचे वातावरण किती खोलवर रुजले आहे हेच कालच्या बैठकीतून दिसून आले. शरद पवार एकीकडे I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत सामील होणार, स्वतःचा पक्ष कितीही कमकुवत असला तरी आघाडीचे बडे नेते म्हणून वावरणार, पण त्याचवेळी “डबल गेम” खेळत पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करणार, यावर I.N.D.I.A आघाडीत प्रचंड नाराजी आहे आणि तीच नाराजी कालच्या बैठकीत झोपेचे सोंग घेतलेल्याला जागा कसं करणार??, अशा कठोर शब्दांत एका बड्या नेत्याच्या तोंडून बाहेर आली आहे.

    Disquiet in Opposition over Sharad Pawar sharing stage with PM Modi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!