• Download App
    गायकवाड नातेवाईकांमधला वाद 50 गुंठे जमिनीचा; पण रंग आला शिंदे - भाजप वादाचा; गोळीबाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे फडणवीसांचे आदेश!!|Dispute between Gaikwad relatives over 50 guntas of land; But Shinde-BJP controversy came to light; Fadnavis orders a high-level inquiry into the firing!!

    गायकवाड नातेवाईकांमधला वाद 50 गुंठे जमिनीचा; पण रंग आला शिंदे – भाजप वादाचा; गोळीबाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे फडणवीसांचे आदेश!!

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण शिवसेना शाखाप्रमुख महेश गायकवाड हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात 50 गुंठे जमिनी संदर्भातला वाद आहे आणि तो वाद भडकल्यानेच काल थेट पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. त्यामुळे महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार जखमी झाले.Dispute between Gaikwad relatives over 50 guntas of land; But Shinde-BJP controversy came to light; Fadnavis orders a high-level inquiry into the firing!!

    मात्र, त्यामुळे राज्यातल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रचंड मोठा वाद उफाळल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहिल्याच्या आरोप केला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.



    सत्ताधारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात थेट गोळीबार केल्याने महाराष्ट्रात मोठा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र उभे राहिले. आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांचाच नातेवाईक असलेल्या शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळ्या काढण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. राहुल पाटील यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या. जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. स्वत: खासदार श्रीकांत शिंदे तिथे उपस्थित आहेत. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली आहे.

    गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. 50 गुंठे जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दोन्ही राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे आहेत. पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यस्थेबरोबर, या दोन्ही पक्षातील स्थानिक पातळीवरील मतभेद समोर आले आहेत.

    गणपत गायकवाड काय म्हणाले?

    मी 10 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्ती संबंधित जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. महेश गायकवाड कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता, असे गणपत गायकवाड यांनी म्हटले आहे. काल संध्याकाळी 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांनी धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. माझ्यासमोर ते माझ्या मुलाला हात लावत असतील, तर माझा जगून काय फायदा? त्यामुळे काल रात्री मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला, असे गणपत गायकवाड यांनी सांगितले.

    मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत ताबडतोब उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

    Dispute between Gaikwad relatives over 50 guntas of land; But Shinde-BJP controversy came to light; Fadnavis orders a high-level inquiry into the firing!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस