• Download App
    Digital 7/12 Legal Status Chandrashekhar Bawankule Maharashtra Revenue Photos Videos Report फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; डिजिटल सातबाऱ्याला मान्यता,

    Revenue Department, : फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; डिजिटल सातबाऱ्याला मान्यता, तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज संपली

    Maharashtra Revenue

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Revenue Department,  राज्याच्या महसूल विभागात ‘डिजिटल क्रांती’ घडवून आणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वसामान्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे डिजिटल सातबाऱ्याला (Digital 7/12) कायदेशीर संरक्षण मिळणार असून, त्यासाठी तलाठ्याच्या सही किंवा शिक्क्याची गरज उरलेली नाही. या निर्णयामुळे नागरिकांना सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची भासणार नाही.Revenue Department,

    गावागाड्यात ‘जो लिहील तलाठी, तेच येईल भाळी’ अशी एक म्हण प्रचलित होती. सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तलाठ्याच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागत असे. अनेकदा वेळेवर सातबारा न मिळणे किंवा त्यासाठी पैशांची मागणी होणे, यांसारख्या समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागत होते. मात्र, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या या एका निर्णयाने ही सर्व मनमानी संपुष्टात आणली आहे. शासनाने याविषयीचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, डिजिटल सातबाऱ्याला आता कायद्याचे बळ मिळाले आहे.Revenue Department,



    काय आहे नवा बदल?

    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या नियम 1971 अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार डिजिटल स्वाक्षरी, क्युआर कोड आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेला सातबारा आता ग्राह्य धरला जाईल. या उताऱ्यावर तलाठ्याच्या वेगळ्या सहीची किंवा स्टॅम्पची गरज नसेल. हा डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उतारे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका आणि न्यायालयांमध्ये कायदेशीर पुरावा म्हणून वैध असतील.

    अवघ्या 15 रुपयांत मिळणार अधिकृत सातबारा

    नागरिकांना आता घरबसल्या किंवा सेतू केंद्रावरून अवघ्या 15 रुपये शुल्कात हा अधिकृत सातबारा मिळणार आहे. महाभूमी पोर्टलवर (digitalsatbara.mahabhumi.gov.in) जाऊन ऑनलाइन पेमेंट करून नागरिक डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा डाऊनलोड करू शकतील. दरम्यान, महसूल विभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आणि क्लिष्ट प्रक्रिया महसूल मंत्र्यांनी अवघ्या वर्षभरात सोप्या केल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. डिजिटल सातबाऱ्याच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार असून पारदर्शकतेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

    जनता निर्णयाचे स्वागत करेल – बावनकुळे

    दरम्यान, हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा, पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा नवा अध्याय लिहितोय. राज्यातील जनता या निर्णयाचे स्वागत करेल, याची मला खात्री आहे, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

    Digital 7/12 Legal Status Chandrashekhar Bawankule Maharashtra Revenue Photos Videos Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gopinath Munde : राज्य सरकारची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा ऑनलाइन लाभ, महाडीबीटी पोर्टलवर करता येणार अर्ज

    Nitesh Rane : मंत्री नीतेश राणे म्हणाले – वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदला बकरी कापण्यास विरोध का करत नाहीत?

    पुणे – नाशिक थेट अति जलद रेल्वे, पण आता नव्या मार्गाने; पुणतांबा आणि अहिल्यानगरचाही मार्गात समावेश