विशेष प्रतिनिधी
नगर : महाराष्ट्र बंदसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी तील घटक पक्ष एकत्र आल्याचे दाखवत असताना नगरमध्ये मात्र बंद दरम्यानच महाविकास आघाडीतले मतभेद उघड्यावर आले आहेत. Differences in the Mahavikas front during the shutdown in the town; Shiv Sena-Congress together, separate NCP; Nabab Malik’s agitation in Mumbai
नगरमध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलन केले, तर राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे स्वतंत्र चूल मांडत नगर बंदचे आवाहन केले आहे.
एरवी देखील काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची तोंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. आज महाविकास आघाडीने एकत्र येऊन पुकारलेल्या बंदच्या वेळी देखील नगरमधले तीन पक्षांमध्ये मतभेद मिटले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे बंदचे आवाहन केलेले दिसत आहे.
मुंबई राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नबाब मलिक यांनी महाराष्ट्र बंद दरम्यान राष्ट्रवादीच्या समर्थकांसह आंदोलन केले. परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून मुंबईत नऊ ठिकाणी बेस्टच्या एसटी गाड्यांवर दगडफेक केल्याची बातमी आहे. या खेरीज सर्व शहरांमध्ये पोलिस बंदोबस्त मध्ये बंद सुरू आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सकाळीच महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
Differences in the Mahavikas front during the shutdown in the town; Shiv Sena-Congress together, separate NCP; Nabab Malik’s agitation in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू