• Download App
    Raj Kundra Porn Case: अखेर शिल्पाने घेतला महत्वाचा निर्णय? पित्यापासून मुलांना दूर ठेवणार ; शिल्पा शेट्टी राज कुंद्राचं घर सोडून वेगळी राहणार! । Did Shilpa finally make an important decision? To keep children away from the father; Shilpa Shetty will leave Raj Kundra's house and stay apart!

    Raj Kundra Porn Case: अखेर शिल्पाने घेतला महत्वाचा निर्णय? पित्यापासून मुलांना दूर ठेवणार ; शिल्पा शेट्टी राज कुंद्राचं घर सोडून वेगळी राहणार!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही महिन्यांपासून खूप अडचणींना सामोरी जात आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा सध्या पोलीस कोठडीत आहे आणि अभिनेत्री एकटीच तिच्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेत आहे. शिल्पा हळूहळू तिचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. ती पुन्हा एकदा आपल्या शोच्या शुटींगमध्ये व्यस्त झाली आहे आणि मुलांची पूर्ण काळजीही घेत आहे. पण या दरम्यान आता अभिनेत्रीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. Did Shilpa finally make an important decision? To keep children away from the father; Shilpa Shetty will leave Raj Kundra’s house and stay apart!



    बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार शिल्पा तिच्या दोन मुलांसोबत स्वतंत्रपणे राहण्याचा विचार करत आहे. वेबसाईटनुसार, अभिनेत्रीचा एक जवळचा मित्र म्हणाला की, राज कुंद्राच्या मागचा वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज कुंद्राचे नाव अश्लील चित्रपट प्रकरणात आल्या नंतर शिल्पा शेट्टीला धक्का बसला आहे. या पैशातूनच हिरे आणि राजची कमाई आहे, हे शिल्पाला माहित देखील नव्हते.

    स्व:कमाईतून मुलांचं संगोपन करणार!

    शिल्पाला तिच्या मुलांना राजने चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशांपासून दूर ठेवायचे आहे. तिला राजची कमाई वापरायची नाही. रिअॅलिटी शो जज करून तिने स्वतः कमावलेल्या पैशातून ती मुलांचे संगोपन करणार आहे आणि आता ती आणखी चित्रपटांमध्ये देखील काम करणार आहे. चित्रपट निर्माते अनुराग बासू आणि प्रियदर्शन यांनी शिल्पाला वचन दिले आहे की, ते तिला चित्रपटात काम देतील. जरी, राज बराच काळ पोलीस कोठडीत राहिला, तरी अभिनेत्रीला अधिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

    आता ही बातमी कितपत खरी आहे की खोटी, हे स्वतः शिल्पा शेट्टीच सांगू शकते. आता शिल्पा राजच्याच घरात राहणार की, मुलांना घेऊन वेगळी राहणार यावर तिने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

    Did Shilpa finally make an important decision? To keep children away from the father; Shilpa Shetty will leave Raj Kundra’s house and stay apart!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस