विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रातल्या राजकारणात दुसऱ्याचे पक्ष आणि घरे फोडण्याचे काम शरद पवारांनी नेहमी केले. आम्ही पण पवारांकडूनच पक्ष फोडायला शिकलो, अशा परखड शब्दांचा घरचा आहेर पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या नेत्याने त्यांना दिला. Dharmaraobaba atram targets sharad pawar
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम (Dharmaraobaba atram )यांच्या विरोधात अहेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाबांची मुलगी आणि गडचिरोली जिल्हा परिषदेची माजी अध्यक्षा भाग्यश्री अत्राम हलगेकर हिला तिकीट देऊन उतरवायचे ठरवले असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा अत्राम यांनी शरद पवारांचा सगळा राजकीय इतिहास काढून त्यांच्यावर शरसंधान साधले.
विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंची उडी, 7 ऑगस्टपासून स्वीकारणार विधानसभा इच्छुकांचे अर्ज
शरद पवार आज 82 वर्षांचे आहेत. त्यांनी खरंतर लोकशाही मार्गाने राजकारण केले पाहिजे. पण त्यांनी संपूर्ण राजकीय कारकीर्द दुसऱ्याचे पक्ष आणि घरे फोडण्यात घालवली. आता देखील ते दुसऱ्या नेत्यांची घरे फोडून त्यांच्या मुलांना आई बापाविरुद्ध उभे करत आहेत, अशी टीका धर्मरावबाबांनी केली.
ज्यांना आपल्या वडिलांविरोधात उभे राहायचे ते राहू देत. भाग्यश्रीला ते तिकीट देतील का??, त्यांनी तिकीट दिले तरी ती उभी राहील का??, यावर प्रश्नचिन्हच आहे, अशी टिप्पणी देखील धर्मरावबाबांनी केली. पण यानिमित्ताने त्यांनी पवारांना पक्ष आणि घरफोडीवरून घरचा आहेर मात्र देऊन टाकला.
Dharmaraobaba atram targets sharad pawar
महत्वाच्या बातम्या
- बीजेडी नेत्या ममता मोहंता यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Ashwini Vaishnav :’आम्ही रील बनवणारे नाही, काम करणारी माणसं आहोत’ ; रेल्वेमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं!
- खाशाबा जाधवांनंतर स्वप्नीलने महाराष्ट्राला मिळवून दिले ऑलिंपिक पदक; शिंदे – फडणवीस सरकारचे 1 कोटींचे बक्षीस जाहीर!!
- Union Minister Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची विम्याच्या हप्त्यावरून जीएसटी हटवण्याची मागणी; अर्थमंत्री सीतारामन यांना लिहिले पत्र