सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dhangar धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. Dhangar Cast in sc reservation
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. Dhangar
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला व त्यांची विचारपूस देखील केली.
बैठकीस राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ आय. एस. चहल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव गणेश पाटील उपस्थित होते. इतर मागास बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे, प्रधान सचिव विनिता वेद-सिंघल दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे ही मागणी खूप वर्षे प्रलंबित आहे. याची अंमलबजावणी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यात राज्याचे महाधिवक्ता, विधी व न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल. आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे सचिव तसेच समन्वय समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग घेऊन अन्य मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी जाईल, तातडीने कार्यवाही व्हावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. Dhangar
यावेळी धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या डॉ सुधाकर शिंदे समितीलाही लवकरात लवकर अहवाल देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. डॉ. शिंदे यांनी समितीच्या कामाबाबत माहिती दिली.
यावेळी शिष्टमंडळातील आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार सर्वश्री प्रकाश शेंडगे, रामहरी रुपनवर, रामराव वडकुते तसेच समन्वय समितीचे पांडुरंग मेरेगळ, विजय गोफने, पंकज देवकते, मधु शिंदे यांनी विविध मुद्दे मांडले. माजी मंत्री महादेव जानकर तसेच समन्वय समितीचे सदस्य अनिल झोरे, सुभाष म्हस्के, बीरू कोळेकर, प्रशांत घोडके, डॉ जे. पी. बघेल, अँड. एम.ए. पाचपोळ, भिमराव सातपुते, रवि सातपुते, दिपक पाटील आदी उपस्थित होते. Dhangar
Dhangar Cast in sc reservation
महत्वाच्या बातम्या
- Assam Congress : आसाम काँग्रेसने आमदारांसह पाच नेत्यांना नोटीस पाठवली
- Narendra Modi : मोदींचा उद्यापासून तीन राज्यांचा दौरा, देशाला मिळणार पहिली वंदे मेट्रो रेल्वे
- JP Nadda : जेपी नड्डा यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजपला केले सावध
- Ladki Bahin Yojna Superhit : बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे