• Download App
    Dhananjay Munde Emotional at Vanjari Convention: "Almost Died Twice in 200 Days" वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे भावुक;

    Dhananjay Munde : वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे भावुक; त्या 200 दिवसात 2 वेळा मरता-मरता राहिलो

    Dhananjay Munde

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : Dhananjay Munde सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला व तो त्यांना द्यावा देखील लागला. त्यानंतर पासून धनंजय मुंडे हे फारसे कुठल्या सामाजिक कार्यक्रमात फारसे आले नव्हते. आज त्यांना वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलावण्यात आले असता, भाषण करताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.Dhananjay Munde

    धनंजय मुंडे म्हणाले, आजच्या कार्यक्रमाला पंकजा ताई येणार होत्या. पण त्या म्हणाल्या मी मागे राहते, भाऊ चालला आहे, माझे वतीने शुभेच्छा दे. त्यांच्या वतीने देखील मी तुम्हाला शुभेच्छा देतो. माझ्या जीवनातला पहिला संघर्ष मी मुंडे साहेबांचा पाहिला. त्यांच्या जीवनातील प्रवास आठवला तरी अंगावर काटा येतो. आज जे काही माझ्यासोबत झाले आहे ते मी सर्व स्वीकारीन. टीका स्वीकारीन, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा. धनंजय मुंडे जर चुकला असेल तर त्याला माफ करू नका, जे काही असेल ते माझ्यापर्यंत राहावे, माझ्या जातीपर्यंत नसावे.Dhananjay Munde



    दोनशे दिवसात मी दोनवेळा मरता-मरता राहिलो

    पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, दोष एका व्यक्तीचा असेल तर त्याला फाशी द्या. पण त्या आधारावर सगळ्या समाजाला दोषी ठरवू नका. धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत आई, बाप, मुलाबाळापर्यंत हे कधीच आले नव्हते. माझ्यासह माझी जात व माझा जिल्हा एवढा बदनाम करावा? एक-दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नसेल, ते मी सहन केले. त्या दोनशे दिवसात मी दोनवेळा मरता-मरता राहिलो. ज्या समाजात जन्माला आलो, त्याचा अभिमान निश्चित आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेंचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरे काय हवे? मंत्रिपदाला काय चाटायचे आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नही

    माझ्यावर कृषिमंत्री असताना आरोप केले. नियतीने, न्यायव्यवस्थेने न्याय दिला. ज्यांनी कटकारस्थान केले, त्याच्या विरोधातच लाख रुपयाचा दंड झाला. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असे धनंजय मुंडे म्हणाले. संघर्षात काय करायचे तर संयम ठेवायचा. गप्प राहिलो नसतो तर मला जो आजार आला, तो आला नसता. कारण माझा स्वभाव व्यक्त होण्याचा आहे. माझ्या वाणीवर सरस्वती मातेची कृपा आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायचो. संघर्षाच्या काळात आपण माझ्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिले. माझ्या स्वतःच्या अंगाची, माझ्या कातड्याची जोडी जरी आपल्या पायात घातली तरी ते फेटू शकत नाही, असेही मुंडे यावेळी म्हणाले.

    Dhananjay Munde Emotional at Vanjari Convention: “Almost Died Twice in 200 Days”

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sarsanghchalak Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- जगाला विविधता स्वीकारणाऱ्या धर्माची गरज; जसे की हिंदू धर्म

    बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची लिटमस टेस्ट!!

    संतशक्तीच्या आशीर्वादाने मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचा संकल्प!