• Download App
    Dhananjay Munde: Parli Court Dismisses Petition Over Election Affidavit धनंजय मुंडे यांना कोर्टाचा दिलासा, विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधात दाखल फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली

    Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कोर्टाचा दिलासा, विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधात दाखल फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली

    Dhananjay Munde

    विशेष प्रतिनिधी

    परळी : Dhananjay Munde परळी स्थित न्यायालयाने विधानसभा निवडणुकीत शपथपत्रामध्ये कथित चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी कोर्टाने करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.Dhananjay Munde

    धनंजय मुंडे यांनी गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावली.Dhananjay Munde



    कोर्टाने करुणा शर्मा यांनी नोंदवलेला जबाब व वकिलांचा युक्तिवाद तथा प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता ही याचिका फेटाळून लावली. धनंजय मुंडे यांच्या वतीने ॲड. अशोक कवडे यांनी काम पाहिले तसेच ॲड.हरिभाऊ गुट्टे यांनी त्यांना मदत केली. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात कथित कृषी घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिकाही यापूर्वीच फेटाळून लावली आहे. त्या प्रकरणातही कोर्टाला कोणतेही तथ्य आढळले नव्हते. त्यामुळे कोर्टाने याचिकाकर्त्यालाच दंड ठोठावला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे.

    नेमके काय आहे प्रकरण

    धनंजय मुंडे यांनी 2024 शपथपत्रात आपल्या 5 अपत्यांचा उल्लेख केला होता. यात त्यांनी शिवानी मुंडे आणि सीशिव मुंडे या दोन अपत्यांचा प्रथमच उल्लेख केला होता. तत्पूर्वी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र दिले होते, त्यात या दोन अपत्यांचा उल्लेख नव्हता. यावर करुणा मुंडे यांनी आक्षेप घेतला होता. विशेषतः धनंजय मुंडे यांनी यावेळी या अपत्यांचा उल्लेख का केला? याचे कारणही शपथपत्रात नमूद केले होते. त्यांच्या मते, तेव्हा ते त्यांच्यावर अवलंबून नव्हते. शपथपत्रामध्ये शपथ पत्र देणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचाच उल्लेख केला जातो. म्हणून आता शिवानी मुंडे आणि सिशिव मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे.

    धनंजय मुंडे यांनी उल्लेख केलेल्या अपत्यांची नावे

    1. शिवानी मुंडे
    2. सीशिव मुंडे
    3. वैष्णवी मुंडे
    4. जानवी मुंडे
    5. आदीश्री मुंडे

    Dhananjay Munde: Parli Court Dismisses Petition Over Election Affidavit

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mira-Bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल; भाजप नेते कृपाशंकर सिंहांचे वक्तव्य

    Kirit Somaiya : उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा भगवा हिरवा केला; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप; मराठी मुंबई आता मुस्लिम मुंबई झाली

    Cabinet Approval : राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय; अंबादेवी संस्थानाला चिखलदऱ्यात मोठी जमीन मंजूर; चिखलदऱ्यात धार्मिक विकासाला चालना