• Download App
    Dhananjay Munde धनंजय मुंडेंना वेगवेगळ्या आरोपांनी घेरले; नेमके त्याच वेळी त्यांना bell's palsy आजाराने ग्रासले!!

    Dhananjay Munde धनंजय मुंडेंना वेगवेगळ्या आरोपांनी घेरले; नेमके त्याच वेळी त्यांना bell’s palsy आजाराने ग्रासले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणात आरोप झाले. त्या पाठोपाठ भ्रष्टाचाराच्या आरोपांनी देखील त्यांना घेरले, पण नेमके त्याच वेळी त्यांना bell’s palsy नावाच्या आजारानेही ग्रासले. धनंजय मुंडे असे सर्व बाजूने अडचणीत सापडले, तरी देखील त्यांनी अजून मंत्रीपद सोडलेले नसून उलट आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट लिहून आपण लवकरच जनतेच्या सेवेत रुजू होऊ, असा दावा त्यांनी केला.

    संतोष देशमुख प्रकरणापासून धनंजय मुंडे यांची राजकीय उतरती भाजणी सुरू झाली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय आश्रय लाभल्याने धनंजय मुंडे राजीनाम्याच्या बिलामतीपासून वाचले. पण त्यांच्याविरुद्ध सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होतच राहिले.

    अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचाराच्या फाइल्स बाहेर काढल्या. त्यांना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दुजोरा दिला. मात्र तरीही धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही. दरम्यानच्या काळात फडणवीस मंत्रिमंडळाच्या दोन बैठका झाल्या. त्या दोन्ही बैठकांना धनंजय मुंडे यांनी दांडी मारली. अजित पवारांनी आदेश दिल्यानंतर देखील त्यांनी जनता दरबार घेतला नाही. यासंदर्भात बातम्या आल्यानंतर मात्र त्यांनी आज खुलासा केला.

    – Bell’s palsy म्हणजे चेहऱ्याचा पक्षाघात

    धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर नुकत्याच शस्त्रक्रिया झाल्या. दरम्यान त्यांना bell’s palsy म्हणजेच चेहऱ्याचा पक्षाघात हा आजार झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. या आजारामुळे चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. चेहरा एका बाजूला झुकतो किंवा डॅमेज होऊ शकतो. या आजारामुळे रुग्णाला दोन मिनिटेही सलग बोलता येत नाही.

    धनंजय मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट लिहून bell’s palsy आजाराने ग्रासल्याचे सांगितले. या आजारामुळेच आपण मंत्रिमंडळाच्या बैठकांना आणि जनता दरबाराला गैरहजर राहिल्याचा तसेच आजारावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असल्यासही खुलासा त्यांनी केला. मात्र धनंजय मुंडे यांनी अद्याप मंत्रीपद सोडलेले नसून ते लवकरच जनतेच्या सेवेत रुजू होणार आहेत, असे त्यांच्याच सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी लिहिले आहे.

    Dhananjay Munde is suffering from Bell’s Palsy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा