• Download App
    Dhananjay Munde धनंजय मुंडेंनी शिवराज दिवटे व कुटुंबीयांशी साधला संवाद; म्हणाले- आम्ही तुमच्या पाठीशी

    Dhananjay Munde धनंजय मुंडेंनी शिवराज दिवटे व कुटुंबीयांशी साधला संवाद; म्हणाले- आम्ही तुमच्या पाठीशी

    विशेष प्रतिनिधी

    बीड : दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात मारहाण झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात जाऊन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच शिवराज व त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच यामध्ये कसल्याही प्रकारच्या जातीपातीच्या कारणावरून भांडण झालेले नाही, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या भूमिकेचे समर्थन केले. Dhananjay Munde

    शिवराज दिवटे याला परळी तालुक्यात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत शिवराज हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी आज शिवराज दिवटे याची भेट घेतली असून त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांची स्वारातीचे अधिष्ठाता डॉक्टर धपाटे यांच्याकडून माहिती घेतली.



    नेमके काय म्हणाले धनंजय मुंडे?

    शिवराजसह संदीपान दिवटे व दिवटे कुटुंब हे माझ्या घरातील असल्यासारखे आहेत, शिवराजला मारहाण केलेल्या संपूर्ण टोळक्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी यासंदर्भात ठोस भूमिका घेतली आहे पुढे तपासांती सर्व गोष्टी स्पष्ट होतील. तसेच या प्रकरणात कुठेही जाती धर्माचा काहीही संबंध येत नाही असे स्वतः एसपींनी देखील स्पष्ट केले असल्याचे धनंजय मुंडे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

    धनंजय मुंडेंकडून पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेचे समर्थन

    आपण शिवराज व दिवटे कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. कोणत्या कारणाने भांडण झाले आणि त्याला कोणी कोणी मारले याचा तपास पोलिसांनी केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये कसल्याही प्रकारच्या जातीपातीच्या कारणावरून भांडण झालेलं नाही. आता त्याचे नेमके कारण काय? काही दिवसात याचे कारण पोलिस सांगतील, असेही मुंडे म्हणाले. पोलिस योग्य तो तपास करतील आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळेल, असा विश्वास असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

    Dhananjay Munde interacted with Shivraj Divate and family; said- We are with you

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ravindra Chavan भाजपा हीच माझी ओळख म्हणणारे रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी!!

    कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र; पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!

    Gopichand Padalkar : ‘पादरी’चे सैराट करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस; गोपीचंद पडळकरांचे ख्रिश्चन धर्मगुरूविरोधात वादग्रस्त विधान