deepali chavan case : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सध्या विरोधी पक्षात असलेल्या भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे. दीपाली चव्हाण या वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या महिलेच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरूनही फडणवीस आणि भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप करत मुद्दाम या प्रकरणातील आरोपींचा बचाव केला जातोय की काय अशी शंका उपस्थित केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले असून त्यात सरकारवर आरोप करतानाच या प्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी यांची नियुक्ती तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केलीय. Devendra fadnavis writes letter to CM Uddhav Thackeray in deepali chavan case
हेही वाचा..
- भारताच्या 7 शेजारी राष्ट्रांत कशी आहे हिंदूंची स्थिती? CDPHRच्या अहवालातून चिंता व्यक्त
- PGCIL Recruitment 2021 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती ; 15 एप्रिल पूर्वी करा अर्ज
- महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे 65 लाखांहून नागरिकांचे लसीकरण करीत घेतली आघाडी
- सस्पेन्स कसला ठेवता, आजचा काय टिझर होता का? भाजपाचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा
- कॉँग्रेसमधील गटबाजीमुळे आपल्याला कामच करू दिले जात नाही, हार्दिक पटेल याचा कॉँग्रेसला घरचा आहेर