- शब्दांमध्ये वर्णन न करता येण्यासारखा अद्भूत प्रसंग;
विशेष प्रतिनिधी
जळगाव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच त्यांच्या वागणुकीतून एक आदर्श निर्माण करून देताना दिसून आले आहेत. असाच काहीसा प्रसंग आजही त्यांच्याबाबतीत घडला आहे. आज उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जळगाव दौऱ्यावर असताना, दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबाल’ या संस्थेस भेट दिली. या ठिकाणी त्यांनी एका दिव्यांग भगिनीकडून ओवाळून घेतले, एवढेच नाहीतर तिच्या पायाच्या अंगठ्याने स्वत:च्या कपाळी गंधही लावून घेतला. त्यांच्या या कृतीने सर्वांचीच मने जिंकली आणि एक आदर्शही निर्माण केला.
फडणवीसांनी या प्रसंगाविषयी ट्वीटद्वारे भावना व्यक्त करत म्हटले की, ‘’आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच.कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं.’’
याचबरोबर ’’तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की “तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.” ते पाहून मी इतकंच म्हणालो, “ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले – “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!” अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
#Jalgaon #inspiring #motivating #emotional #Maharashtra #blessed #touched #DevendraFadnavis #Maharashtra #bjp #devendrafadnavis
devendra fadnavis tweets share emotional picture
महत्वाच्या बातम्या
- ‘’राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि…’’ फडणवीसांचा थेट निशाणा!
- फडणवीसांचे पवारांना प्राथमिक शाळेतले “धडे”; “वासुनाका”कार भाऊ पाध्येंचे वाचा बोल खडे!!
- ‘’मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, याने इतिहास बदलत नाही’’ फडणवीसांचा शरद पवारांना टोला!
- मणिपूर मधल्या हिंसाचाराचे मूळ कारण काँग्रेसचेच फूटपाडे धोरण; राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात स्थानिक नेत्याचा आरोप