विशेष प्रतिनिधी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ बॉम्ब टाकला. एका व्हिडिओ बॉम्बमुळे सगळे चिडीचूप झाले आहेत. दुसरा व्हिडिओ उद्या-परवा येणार आहे. दुसरा व्हिडिओ पहिल्यापेक्षाही खुप स्ट्राँग असेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.Devendra Fadnavis’ second video bomb will come tomorrow, much stronger than the first, Chandrakant Patil warns
महाविकास आघाडी सरकारकडून विरोधकांविरोधात खोटे गुन्हे रचून त्यांना अडकवण्याचा डाव सध्या राज्यात सुरू आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्षांना वेगवेगळ्या फुटेजने भरलेला एक पेनड्राईव्ह दिला होता. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी दोन तास मुंबई सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.
यावर बोलताना पाटील म्हणाले, फडणवीस यांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील जनता आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणून, आम्ही तुम्हाला त्रास देतो असे सध्या राज्यात सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत.
त्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना माहितीचा सोअर्स कोठून मिळाला हे विचारता येत नाही. मात्र त्यांना ही माहिती कोठून मिळाली हे विचारण्यासाठी चौकशीला बोलवण्यात आले. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची निर्मिती झाली आहे. घटनेप्रमाणे विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्याच्या प्रमाणे दर्जा आहे. त्यामुळे त्याला माहिती कोठून मिळाली हे विचारायचे नसते. मात्र, अंधेर नगरी चौपट राजा असा प्रकार सध्या सुरू आहे.
Devendra Fadnavis’ second video bomb will come tomorrow, much stronger than the first, Chandrakant Patil warns
महत्त्वाच्या बातम्या
- किसान मोर्चाला भाजपच्या विजयाचा मोठा धक्का, पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी
- पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिध्दू- सुनील जाखड एकत्र, पक्षश्रेष्ठींना धक्का देण्याची तयारी
- राशन- प्रशासन-सुशासन, पुरुषांपेक्षा १६ टक्के जादा महिलांनी दिली भाजपाची साथ
- WEST BENGAL : लोकप्रिय अभिनेत्री रूपा दत्ता- शिवसेना-ममता बॅनर्जींची कट्टर आलोचक-पाकिटमार ?…. डायरीत लिहिला म्हणे मारलेल्या पकिटांचा हिशोब…