• Download App
    ‘’सातत्याने जिंकणारे कधी तरी हारले तर...’’ कसबा पोटनिवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांचा विरोधकांना टोला! Devendra Fadnavis reaction on Kasba byelection results

    ‘’सातत्याने जिंकणारे कधी तरी हारले तर…’’ कसबा पोटनिवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांचा विरोधकांना टोला!

    ‘’कसब्यामधील विजय हा महाविकास आघाडीचा विजय नाही, कारण…’’ असंही म्हणाले आहेत.

    प्रतिनिधी

    राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी ११ हजार ४० मतांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला.  या निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत विरोधक भाजपावर टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.Devendra Fadnavis reaction on Kasba byelection results

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘’पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या, की सातत्याने जिंकणारे कधी तरी हारले तर त्याचीच चर्चा जास्त होते. त्यामुळे ती चर्चा होणे साहाजिक आहे. पहिल्यांदा तर मी देशभरात भाजपाला जे यश मिळालं आहे, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपाच्या त्रिपुरा, नागालँड युनिटचे मनापासून अभिनंदन करतो. ’’


    Kasba By-Election Result : पुण्यातील कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी


    याशिवाय ‘’देशभरात ज्याप्रकारे मोदींना समर्थन मिळतं आहे. ही २०२४ ची नांदी आहे, हे निश्चितपणे सांगतो. महाराष्ट्रात दोन पोटनिवडणुका झाल्या. दोन्ही जागा आमच्या निवडून येतील अशाप्रकारे आम्हाला अपेक्षित होतं. मात्र कसब्यामध्ये अतिशय चांगले मतं घेऊनदेखील आम्ही विजयी होऊ शकलो नाही. जवळपास ४५ टक्के मतं आम्हाला मिळाली. जी २००९ आणि २०१४ पेक्षाही चांगली आहेत. ’’  असंही फडणवीसांनी सांगितलं.

    याचबरोबर  ‘’तथापि ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे, की कसब्यामधील विजय हा महाविकास आघाडीचा विजय नाही. कारण, काँग्रेसच्या उमेदवाराने राहुल गांधींचे साधे फोटोही वापरले नाहीत. त्यामुळे रविंद्र धंगेकर यांना एक नैसर्गिक सहानुभूती होती. आमच्या सर्वेतही ती दिसत होती. पण आम्हाला असा विश्वास होती की हळूहळू ही सहानुभूती कमी होईल.  पण ती शेवटपर्यंत राहिली आणि त्याच्यामुळे हा विजय त्यांना मिळाला आणि कसाही मिळाला असला तरी तो विजय आहे, त्यामुळे त्याबदद्ल त्यांचं मी अभिनंदन करतो. ’’ असंही शेवटी फडणवीस म्हणाले.

    महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, त्यांची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. रविंद्र धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मतं मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळवता आली. मागील २८ वर्षांपासून कसबा मतदारसंघ हा भाजपाचा गड राहिला होता. यंदा मात्र  तो काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. धंगेकरांच्या विजयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

    Devendra Fadnavis reaction on Kasba byelection results

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ