• Download App
    अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले... Devendra Fadnavis reaction on Ajit Pawars desire to become Chief Minister

    अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

    राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याच्या भाकीतांवरही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. नुकतच त्यांनी एका मुलाखतीत बोलताना २०२४च्या निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असंही विधान केल्याचं समोर आलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. Devendra Fadnavis reaction on Ajit Pawars desire to become Chief Minister

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’मी त्यांची मुलाखत काही पाहीली नाही. कोणालाही आवडू शकतं मुख्यमंत्री व्हायला, आवडेल हे मला असं वाटतं काही वावगं नाही. अनेकांना असं आवडतं पण सगळ्यांनाच होता येतं असं नाही. ठीक आहे आमच्या शुभेच्छा आहेत.’’

    याशिवाय राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असे मागील काही दिवसांत भाकीत व्यक्त केले जात होते, पण तुम्ही अगदी शांत होता?  यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘’ती सगळी भाकीतं पाहून, ऐकून माझंही मनोरंजन होत होतं. मनोरंजन घेत होतो मी.’’

    त्या मूठीला इतक्या भेगा आहेत की… –

    याचबरोबर ज्याप्रकारे अजित पवारांबद्दल संजय राऊत किंवा महाविकास आघाडीतून विरोध होत आहे, कुठंतरी असं चित्र दिसतय की अजित पवारांना महाविकास आघाडीतून ढकलण्यासाठी काही लोक आतूर झालेले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, ‘’त्यांच्याकडे आत काय सुरू आहे, हे मला माहीत नाही. फक्त मी वारंवार जे सांगतोय की वज्रमूठ-वज्रमूठ ते जे म्हणत आहेत, त्या मूठीला इतक्या भेगा आहेत की वज्रमूठ कधी होऊ शकत नाही. त्याचाच प्रत्यय आपल्याला येतो आहे.’’

    Devendra Fadnavis reaction on Ajit Pawars desire to become Chief Minister

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा