• Download App
    Fadnavis Dismisses NCP Merger: "Ajit Pawar Would Have Informed BJP First" अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे:आम्हाला न सांगता विलीनीकरणाची चर्चा करतील का? - देवेंद्र फडणवीस

    Fadnavis : अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे:आम्हाला न सांगता विलीनीकरणाची चर्चा करतील का? – देवेंद्र फडणवीस

    Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Fadnavis उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. “दोन्ही पक्ष १२ फेब्रुवारीला एकत्र येणार होते,” या शरद पवार आणि जयंत पाटील यांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढला आहे. “अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय विलीनीकरणाचा निर्णय घेतील का?” असा थेट सवाल करत, राष्ट्रवादीने असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भाजपशी चर्चा करणे आवश्यक असल्याची ‘अट’ मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.Fadnavis

    शरद पवार गटाकडून असा दावा केला जात आहे की, अजित पवार स्वतः विलीनीकरणासाठी आग्रही होते आणि त्यासाठी अनेक गुप्त बैठकाही झाल्या होत्या. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “जर चर्चा अंतिम टप्प्यात असती आणि १२ फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली असती, तर अजितदादांनी आम्हाला नक्कीच कळवले असते. अशा कोणत्याही तारखेची माहिती आम्हाला नाही. अजित पवार आणि मी तासनतास चर्चा करत बसलो होतो. अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे. पण त्यांनी विलीनीकरणाबाबत असा कोणताही शब्द काढला नाही.”Fadnavis



    विलीनीकरण की सत्तेतून बाहेर पडण्याची तयारी?

    मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी एक महत्त्वाचा तांत्रिक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “अजित पवार अशी चर्चा करत होते, तर ते सरकारमधून बाहेर पडण्यासाठी करत होते का? मी यावर अनेक गोष्टी सांगू शकतो, पण सध्या मला त्यावर बोलायचे नाही.”

    सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सत्तेत आहे, तर शरद पवारांची राष्ट्रवादी विरोधात आहे. अशा स्थितीत विलीनीकरण झाले तर सत्तेचे समीकरण बदलू शकते, याकडेच मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे.

    सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला समर्थन

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सुनेत्रा वहिनींनी पक्षाचे नेतृत्व करावे हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या या निर्णयासोबत खंबीरपणे उभे राहणे हे महायुतीचा धर्म म्हणून आमचे काम आहे.”

    याआधी तटकरेंनीही शरद पवारांचा दावा खोडला

    दरम्यान, अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनीही याआधी शरद पवार गटाचा दावा खोडून काढला आहे. “बारामती येथे झालेली बैठक ही विलीनीकरणासाठी नव्हती, तर केवळ जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवण्याबाबत होती,” असे सांगत त्यांनी शरद पवारांचा एकत्रीकरणाचा दावा फेटाळून लावला आहे. यामुळे दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी विधाने समोर येत आहेत.

    नेमकं काय होणार?

    दरम्यान, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे. तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल. असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगितल्यानंतर आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Fadnavis Dismisses NCP Merger: “Ajit Pawar Would Have Informed BJP First”

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    यशवंत शिष्याची काय ही अवस्था??; सुनेच्या पक्षात सुद्धा विलीन होता येईना!!

    Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार; ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा नंबर पहिला; एकनाथ शिंदेंची कोल्हापुरातून मोठी घोषणा

    Rohit Pawar : अजितदादांचा तेरावा झाल्यावरच राजकीय चर्चा, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल माहिती नव्हते, रोहित पवार यांची प्रतिक्रिया