• Download App
    Fadnavis Warns Digital Arrest 100 Percent Fraud VIDEOS देवेंद्र फडणवीस म्हणाले- डिजिटल अरेस्ट हा 100 टक्के फ्रॉडच, बळी पडू नका, थेट परदेशातून हलतात सूत्रे

    Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- डिजिटल अरेस्ट हा 100 टक्के फ्रॉडच, बळी पडू नका, थेट परदेशातून हलतात सूत्रे

    Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : “Fadnavis देशाच्या कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे कुणालाही डिजिटली अटक करता येत नाही. असा कोणताही फोन किंवा व्हिडिओ कॉल आल्यास तो १००% फ्रॉड आहे हे ओळखा,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सायबर भामट्यांबाबत माहिती दिली. आमदार अबू आसिम आझमी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या गुन्ह्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि धक्कादायक ‘मोडस ऑपरेंडी’ सभागृहासमोर मांडली.Fadnavis

    गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी रिकव्हरीची आकडेवारी मांडताना ‘गोल्डन अवर’चे महत्त्व सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की. एका प्रकरणात फसवणूक झाल्यावर दुसऱ्याच दिवशी तक्रार आल्याने ८७ लाखांपैकी ७८ लाख रुपये वाचवण्यात यश आले.Fadnavis



    बड्या अधिकाऱ्यांना घातला गंडा

    गुन्हेगार सीबीआय किंवा कस्टम अधिकारी असल्याचे भासवून “तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे” अशी भीती घालतात. या जाळ्यात निवृत्त आयएएस अधिकारी आणि नौदलाचे उच्चपदस्थ निवृत्त अधिकारीदेखील अडकले आहेत. “तडजोडीसाठी २० ते ४० लाख रुपये मागितले जातात आणि घाबरलेला माणूस ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करतो. हे पैसे विविध खात्यांतून फिरवून तात्काळ परदेशातील बँकांमध्ये वळवले जातात. या संपूर्ण रॅकेटची सूत्रे परदेशातून हलतात.

    Fadnavis Warns Digital Arrest 100 Percent Fraud VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Unseasonal Rain : अवकाळी, गारपिटीने 7 जिल्ह्यांत 37 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; तत्काळ सर्वेक्षण, पंचनाम्याचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन

    Dada Bhuse : अर्थसंकल्पीय अधिवेशन : दादा भुसे म्हणाले- मराठवाडा, विदर्भातील 255 मराठी शाळा बंद, राज्यात 65 हजार शाळांत अजूनही सीसीटीव्ही नाही

    शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांचा राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी!!