विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis डिजिटलाइझ पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागरिकांना आता व्हॉट्सअॅपवर सेवा मिळणार असून, त्यात 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटलाइझ पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले आहे.Devendra Fadnavis
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता, याची आपल्याला कल्पना आहे. आता आपले सरकारचे व्हर्जन जुने झाले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार, नागरिकांना कोणत्या योजनांची निकड आहे, याचा अभ्यास केला आहे. आता आपण डिजिटल पद्धतीने सेवा देण्याचे प्रयत्न करणार आहोत. लोकांकडून जी मागणी येते,म त्यात सेवा आणि योजनांची मागणी येते. त्यामुळे डिजिटलाइझ पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करणार आहे.Devendra Fadnavis
सरकारचे हे दुसरे व्हर्जन
राज्यात सेवा आणि सुविधा संदर्भातील डिजिटलाइझ पद्धतीचा पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंतच पूर्ण होईल. तर 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सरकारकडे असलेल्या रेकॉर्ड वरूनच आपण माहिती भरणार आहोत, त्यामुळे आपले सरकारचे हे दुसरे व्हर्जन येत आहे. यात चार टप्पे असतील, त्यामुळे नागरिकांना केलेल्या अर्ज सध्या कुठे आहे, हेही पाहता येणार आहे. तसेच लोकांना डिजिटल सेवा मिळणे आणि प्रेडेक्टेबल् होणार, व्हॉट्सअॅपवर देखील सेवा उपलब्ध करून देणार आहोत, अशी देखील माहिती फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्रात 1 लाख 500 हजार कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रात उद्योजकीय गुंतवणुकीला पुन्हा एकदा मोठी चालना मिळाली आहे, ज्यामुळे राज्याने 1 लाख 500 हजार कोटी रुपयांचे नवीन करार केले आहेत. यामुळे सुमारे 47 हजार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर समाधान व्यक्त करताना सांगितले की, या गुंतवणुकीतून विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे राहणार आहेत. यामध्ये रायगडमध्ये डेटा सेंटरची उभारणी, तसेच नाशिक आणि नंदुरबारमध्ये 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक समाविष्ट आहे, ज्यामुळे 600 रोजगार निर्माण होतील.
याव्यतिरिक्त, विदर्भात रिलायन्स कंपनी फूड पार्क आणि शीतपेय पार्कसाठी 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्याचप्रमाणे, अदानी समूह देखील 70 हजार कोटींची मोठी गुंतवणूक करणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला वेग मिळणार असून, राज्याच्या विविध भागांमध्ये रोजगाराच्या संधी वाढणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
Devendra Fadnavis Announces WhatsApp Services
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचे ‘व्होट चोरी’ कागदपत्र तर परदेशात तयार! म्यानमार कनेक्शन उघड, काँग्रेस बचावाच्या भूमिकेत
- Election Commission : निवडणूक आयोगाची राज्य अधिकाऱ्यांसोबत बैठक; मतदार पडताळणीवर चर्चा; बिहारमध्ये आधार कार्डला 12वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश
- Vote chori चोरीच्या आरोपांचे म्यानमार मध्ये डिजिटल धागेदोरे; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संशयाचे वारे!!
- याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!