प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रात कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता टिपून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. राज्यात ठिकठिकाणी छोटे व्यापारी, व्यावसायिक छोटी – मोठी आंदोलने करून राज्य सरकारच्या निर्बंधांना विरोध करीत आहेत. त्यांच्या भावना फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत. devendra fadanavis writes to CM uddhav thackeray over lockdown issue, demands new notification
कोरोना प्रतिबंधांविरोधात असंतोष वाढतोय. त्यामुळे तात्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायिक, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राज्यात निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाउनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालये अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर वाहतूक खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर्स पार्टस दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत. त्यामुळे समाजातल्या सर्व छोट्या – मोठ्या घटकांशी चर्चा करून निर्बंधांची नव्याने रचना करावी आणि नवी अधिसूचना जारी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्रातून केली आहे.
devendra fadanavis writes to CM uddhav thackeray over lockdown issue, demands new notification