प्रतिनिधी
मुंबई : 2022 च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ५०० स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केला आहे. Devendra Fadanavis take on Uddhav Thackeray over Mumbai municipal elections
यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला आहे. 2017 मध्ये शिवसेनेने दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी 2022 ची महापालिका निवडणूक उजाडावी लागली, अशा शब्दांत फडणवीस यांनी टोला हाणला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा विशेष लक्षवेधी द्वारे उपस्थित केला होता. त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून शेअर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट असे :
“तेव्हाचे शिवसेना पक्षप्रमुख आणि आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे 500 फुटापर्यंत कोणताही कर घेणार नाही, हा निर्णय करा.” (विधानसभा, 28 डिसेंबर 2021)
मुंबई महापालिकेची निवडणूक आल्यामुळे उद्धव ठाकरे ऍक्टिव्हेट झाले आहेत. सध्या जरी ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षावरून राज्याचा कारभार हाकत असले तरी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केलेल्या निर्णयानंतर आणखीही निर्णय काही लोकप्रिय निर्णय जाहीर करतील, असे दिसून येत आहे.