प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीतल्या मोठ्या फुटीनंतर शिवसेनेतल्या फुटीचा दुसरा एपिसोड सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का देत विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे. हा प्रवेश सोहळा आजच होणार असून नीलम गोऱ्हे या दुपारपर्यंत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. Deputy Speaker of Legislative Council Neelam Gorhe also joined shindes Shiv Sena!
महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारा, स्वच्छ चेहरा, म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नीलम गोऱ्हे या सातत्याने ठाकरे गटाची बाजू मांडत होत्या. मात्र, आता नीलम गोऱ्हे याच शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. राज्यातील राजकीय पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.
– अंबादास दानवेंनी दावा फेटाळला
मला तरी वाटत नाही की, नीलम गोऱ्हे या शिंदे सोबत जातील, त्या ठाकरे गटातच राहणार असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. नीलम गोऱ्हे कुठेही जाणार नाहीत, त्या ठाकरे गटांसोबतच राहतील असा दावा देखील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
Deputy Speaker of Legislative Council Neelam Gorhe also joined shindes Shiv Sena!
महत्वाच्या बातम्या
- मणिपूरमध्ये २४ बंकर उध्वस्त; डोंगर-दऱ्यांमध्ये शोधमोहीम सुरू, ३५२ जण ताब्यात!
- पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल
- ‘’अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केल्याचे का कळवले नाही?’’; शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल!
- पुण्यातील धक्कादायक घटना : मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV, शाळेत शिक्षणाच्या नावाखाली ख्रिश्चन धर्माचा प्रचार?