• Download App
    Eknath Shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Eknath Shinde

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Eknath Shinde पाकिस्तानवर कडक कारवाई करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असल्याचा दावा शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. काँग्रेसने मतपेटीच्या राजकारणामुळे केव्हाच पाक किंवा अतिरेक्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. याऊलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकविरोधात अत्यंत कठोर निर्णय घेत आहेत, असे ते म्हणालेत.Eknath Shinde

    जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये गत 22 एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला झाला. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह 26 पर्यटक मारले गेले. या हल्ल्याविरोधात देशात संतापाची लाट उसळली असताना केंद्राने पाकविरोधात काही कठोर निर्णय घेतले. या निर्णयाचे कौतुक करताना एकनाथ शिंदे यांनी मोदींचे कौतुक व काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते गुरुवारी महाराष्ट्र दिनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच पाकविरोधात कडक भूमिका घेतली आहे. अॅक्शनवर रिअॅक्शन दिली आहे. पाकच्या हायकमिशनमधून 5 अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली. व्हिसा बंद केला. अटारी बॉर्डर बंद केली. भारतातील पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ देश सोडून जाण्याचे आदेश दिले.



    लष्कराला फ्रि हँड, असे कधी झाले होते का?

    मोदींनी नुकतीच तिन्ही संरक्षण दलांची बैठक घेतली. त्यांना देशाची सुरक्षा करण्याची व 140 कोटी जनतेचे संरक्षण करण्याची खुली सूट दिली आहे. असे कधी झाले होते का? यापूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक कुणी केली होती? सैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर मोदींनी तत्काळ सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. आताही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर मिळेल. पाकिस्तानचे नामोनिशाण मिटेल अशी सुरुवात झाली आहे.

    पाकचे नामोनिशाण मिटवून हिशेब करणार

    एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, मोदींनी तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यात त्यांची कठोर निर्णय घेण्याची भूमिका दिसली. त्यानंतर त्यांनी सर्वसामान्य जनेतला दिलासा देणारा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला. एकीकडे कठोर भूमिका व दुसरीकडे जनतेप्रती नम्र भूमिका अशी भूमिका दाखवली. आतापर्यंत काँग्रेसने मतपेटीच्या राजकारणामुळे अतिरेकी व पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली नाही. मतांच्या राजकारणामुळे भारताचे लाखो सैनिक शहीद झाले. ही दुर्दैवी गोष्ट आहे. काँग्रेसला याचा हिशेब द्यावा लागेल. पंतप्रएधान मोदीची पाकचे नामोनिशाण मिटवून याचा हिशेब चुकता करतील, असे ते म्हणाले.

    Deputy Chief Minister Eknath Shinde said, Modi is the first Prime Minister to take strict action against Pakistan!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!