‘’यांची राजकीय दुकानं बंद होत असल्याने…’’ असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या काही मंत्र्यांनी शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट घेतली. खरंतर ही भेट म्हणजे फार मोठे विरोधी ऐक्य साधण्यासाठी नसून स्वतःचे दिल्ली सरकार केंद्र सरकारच्या कायदेशीर बडग्यापासून वाचविण्यासाठी असलेली धडपडच असल्याचे दिसून आले. केजरीवाल पवारांच्या या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis’ reaction to Arvind Kejriwal and Sharad Pawars meeting
फडणवीस म्हणाले, ‘’खूप चांगली गोष्ट आहे. हे तेच केजरीवाल आहेत ज्यांनी हे म्हटलं होतं, की शरद पवारांविरोधात दहा दिवसांपासून मी आंदोलन करत आहे, उपोषण करत आहे. कारण, देशातील सर्वात मोठे काळाबाजारी हे शरद पवार आहेत. असं अरिवंद केजरीवालच म्हणाले होते, आता तेच त्यांच्या चौकटीवर आहेत.’’
याचबरोबर ‘’अरविंद केजरीवालांबाबत शरद पवारांनी काय म्हटलं होतं, हेही सर्वांना माहीत आहे. तर हे सर्व लोक एकत्र येत आहेत, कारण यांच्या लक्षात आलं आहे की, कशाप्रकारे पंतप्रधान मोदींना देशात, देशाबाहेर, संपूर्ण विश्वात समर्थन मिळत आहे. या सर्वांचे राजकीय दुकान बंद होत आहे आणि आपली राजकीय दुकानं बंद होत असल्याने, हे सगळेजण सोबत येत आहेत. मी असं मानतो की त्यांच्या एकत्र येण्याने काहीच फरक पडणार नाही.’’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis reaction to Arvind Kejriwal and Sharad Pawars meeting
महत्वाच्या बातम्या
- SBI : 2000 च्या नोटा बदलून घेताना स्लिप भरण्याची गरज नाही; स्टेट बँकेचा खुलासा
- इतिहासातील 10 अशा घटना जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी केले होते लोकशाहीच्या मंदिरांचे उद्घाटन, सोनिया गांधी- राहुल गांधी यांनी पदावर नसतानाही केली होती पायाभरणी
- राजस्थान : …अखेर पाकिस्तानातून भारतात आश्रयास आलेल्या हिंदूंना जमीन मिळणार; जिल्हाधिकारी टीना दाबींची आश्वासनपूर्ती
- विरोधक पाला पाचोळ्यासारखे उडून जातील; केजरीवाल – ठाकरे – पवार भेटीवर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी