• Download App
    'इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा..'|Deputy Chief Minister Devendra Fadnavis reacted to the success of the BJP and NDA alliance in the Lok Sabha elections

    ‘इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा..’

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निकालावर प्रतिक्रिया देताना विरोधकांना दर्शवली वस्तूस्थिती


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल काल लागले यामध्ये देशातील जनते पुन्हा एका भाजप प्रणित एनडीए आघाडीला बहुमत दिले. यामुळे आता देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालवर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.Deputy Chief Minister Devendra Fadnavis reacted to the success of the BJP and NDA alliance in the Lok Sabha elections

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो ! इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.



    तसेच, ‘उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मा. मोदीजींना साथ दिली आहे.’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

    याशिवाय ‘संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर भरून काढू. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो !’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

    Deputy Chief Minister Devendra Fadnavis reacted to the success of the BJP and NDA alliance in the Lok Sabha elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा