‘’अनेक जणांचे बुरखे फाटणार आणि काहीजण नागडेही होणार’’ असा सूचक इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेतील विविध घोटाळ्यांसंदर्भात ऑडिटर अँड कंट्रोलर जनरल अर्थात कॅगने मारलेल्या ताशेऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व घोटाळ्यांच्या चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. कोरोना काळात झालेले 12000 कोटींचे घोटाळे त्यामुळे स्कॅनर खाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सूचक इशारा देत, उद्धव ठाकरेंच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray over corruption in Mumbai Municipal Corporation
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘’उद्धव ठाकरेंचा आक्रोश मी समजू शकतो, कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महानगरपालिकेत 12,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आणि आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर एसआयटी नेमली आहे. अनेक लोकांचे बुरखे फाटणार आणि काहीजण नागडेही होणार आहेत.’’
याचबरोबर ‘’मध्यंतरी दोन-अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने जी ‘गॅंग’ मुंबई महापालिकेत काम करत होती, त्या ‘गँग’चे आता काही खरे नाही हे लक्षात आल्याने उद्धव ठाकरे आता बावचळल्यासारखे बोलत आहेत.’’ असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray over corruption in Mumbai Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांची पॉप्युलरिटी, भाजपची सलग तिसऱ्यांदा शंभरी, ही तर पवारांची राजकीय कंबख्ती!!
- Maharashtra Drone Mission : देशातील पहिले ड्रोन धोरण आणि इकोसिस्टम महाराष्ट्राने तयार करावे – फडणवीस
- इतरांना गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचीच खरी गद्दारी; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान
- तीच कॅसेट वाचवू नका, निदान स्क्रिप्ट रायटर तरी बदला; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला