• Download App
    धुळे शहरात डेंग्यू, साथीचे थैमान; बालकाचा मृत्यू, महापालिका प्रशासन ढिम्मच ; सामान्यांचा संताप । Dengue, epidemic in Dhule city; Death of a child, Municipal Administration careless; The common people Are Angry

    धुळे शहरात डेंग्यू, साथीचे थैमान; बालकाचा मृत्यू, महापालिका प्रशासन ढिम्मच ; सामान्यांचा संताप

    विशेष प्रतिनिधी

    धुळे : धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू सह विविध साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. एका सहा वर्षीय बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. मात्र,धुळे महापालिका प्रशासन अद्यापही जागे झालेले नाही. यामुळे सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. Dengue, epidemic in Dhule city; Death of a child, Municipal Administration careless; The common people Are Angry


    मुंबईत आता डेंगीचा वाढता कहर, गेल्या वर्षीपेक्षा रुग्णसंख्येत चौपट वाढ


    धुळे शहरात डेंग्यू ,मलेरिया यासह विविध साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात धुळे महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या डेंग्यूने साक्री रोड भागात राहणाऱ्या वेद सूर्यवंशी बालकाचा बळी घेतला. वेद सूर्यवंशी या सहा वर्षीय बालकाला डेंग्यूची लागण झाल्यानंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने त्याला औरंगाबादला नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला,अशी माहिती वेद सूर्यवंशी यांच्या आईने दिली.

    डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेने शहराच्या अनेक भागात फवारणी आणि धुरळणी केलेली नाही. प्रशासन अजून किती जणांचे जीव जाण्याची वाट बघत आहे.
    – बी.एन. शिंदे, वेद सूर्यवंशी याचा मामा

    वेद सूर्यवंशी या बालकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करावा.

    – हर्षल परदेशी, अध्यक्ष, मनसे विद्यार्थी आघाडी

    Dengue, epidemic in Dhule city; Death of a child, Municipal Administration careless; The common people Are Angry

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !