विशेष प्रतिनिधी
मुंबई : Fadnavis सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन खरेदीसाठी किमान १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली. यासोबतच फडणवीस यांनी पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.Fadnavis
सह्याद्री अतिथिगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसांत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा फडणवीस यांनी घेतला. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी-सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे, अशी यंत्रणा उभी करावी. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधितांकडून पार पाडण्याच्ये सांगण्यात आले.
संभाजीनगरच्या जांबरगावातील ॲग्रो हब दीड महिन्यात सुरू
पणन विभागाचे सादरीकरण करताना विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथे ॲग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या ४५ दिवसांत त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. नवी मुंबई येथे महाबाजार उभारण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे. राज्यातील १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटी, अडीच कोटी ते पाच कोटी, पाच ते दहा कोटी, दहा ते पंचवीस कोटी असे उपवर्गीकरण करण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, या वेळी इतर मुद्यांवरही चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सीबीएसई पॅटर्नचा अवलंब करणार : मंत्री दादाजी भुसे
विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे त्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले आहे. ही योजना सुरू राहावी, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचे स्वागत करा. यासाठी सर्व मंत्री, सचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी या वेळी बोलताना येत्या १०० दिवसांत करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा सादर केला. शाळा परिसर आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, सीबीएसई पॅटर्नचा अवलंब करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळांमध्ये आणखी काय उपाययोजना करता येतील, याबाबतही चर्चा झाली.
Demand from the Center for 15-day extension of soybean procurement; Fadnavis discusses with Agriculture Minister Chouhan
महत्वाच्या बातम्या
- युजीसीच्या नियुक्ती नियमांबद्दल काँग्रेस खोटेपणा पसरवत आहे”
- बिजापूरमध्ये पाच नक्षलवादी ठार, चार किलो आयईडी जप्त
- Hajj pilgrimage हज यात्रेसाठी भारत अन् सौदी अरेबियामध्ये मोठा करार; पंतप्रधान मोदी म्हणाले – संबंध अधिक मजबूत होतील
- नाशिकमध्ये मोठा अपघात ; ट्रक अन् पिकअपच्या धडकेत आठ जणांचा मृत्यू, अनेक जखमी