• Download App
    Defence Corridor: Sambhaji Nagar, Nashik - CM Fadnavis उद्योग संवाद परिषद;

    CM Fadnavis : उद्योग संवाद परिषद; देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कॉरिडॉरमध्ये संभाजीनगर- CM, यूपी, तामिळनाडूपेक्षाही अधिक गुंतवणूक आणू

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Fadnavis देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कॉरिडॉरची उभारणी नाशिकमध्ये होत आहे. छत्रपती संभाजीनगर त्या कॉरिडॉरचा भाग असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२५ जून) केली. एकेकाळी केवळ धार्मिक आणि कृषी केंद्र म्हणून ओळखले जाणारे नाशिक आता संरक्षण उत्पादन क्षेत्रातील ‘न्यू मॅग्नेट’ बनणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केल्याने सध्या डिफेन्स कॉरिडॉर जरी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूत असला तरी त्याहीपेक्षा मोठा संरक्षण कॉरिडॉर नाशिकजवळ विकसित होणार आहे. तो पुणे-अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरजवळील प्रस्तावित कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग असेल. नाशिकला अंतराळ क्षेत्रातही देशातील ‘नेक्स्ट डेस्टिनेशन’ बनवणार. प्रस्तावित कॉरिडॉरमुळे नाशिकसह इतर भागांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाच नव्हे, तर राष्ट्रीय संरक्षण सामर्थ्यालाही बळ मिळेल, असेही त्यांनी मुंबईत आयोजित महाराष्ट्र उद्योग संवादमध्ये सांगितले.CM Fadnavis

    छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरणाची मागणी

    उद्योग संवादमधील चर्चासत्रात छत्रपती संभाजीनगर फर्स्टचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सीएमआयए सचिव अथर्वेशराज नंदावत, माजी अध्यक्ष सुनील रायठठ्ठा, मसिआचे माजी अध्यक्ष किरण जगताप, टर्टल इंडियाचे संचालक भरत गिते, स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष योगेश मानधनी यांनी सहभाग घेतला. त्यांनी मराठवाड्यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरणाची मागणी केली. मानधनी म्हणाले की जालन्यात आज ७० लाख टन स्टील निर्मिती होते. योग्य धोरण व सवलती मिळाल्यास या क्षेत्रात भविष्यात मोठी वाढ शक्य आहे.



    देशाच्या जीडीपीत राज्याचा वाटा १४%

    महाराष्ट्र देशाच्या जीडीपीत १४ टक्क्यांहून अधिक योगदान देणारे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य आहे. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने १.६४ लाख कोटींच्या थेट परकीय गुंतवणुकीसह देशातील एकूण एफडीआयपैकी ४० टक्के वाटा मिळवला आहे.

    संभाजीनगर ईव्ही राजधानीच्या दिशेने

    गडचिरोली : एकेकाळी उद्योगशून्य असलेला हा जिल्हा आता नवीन ‘स्टील हब’ बनत आहे, जिथे देशाच्या एक तृतीयांश स्टील उत्पादनाचे लक्ष्य आहे.
    अमरावती : ‘पीएम मित्रा’ उपक्रमांतर्गत भारताची सर्वात स्मार्ट कापड परिसंस्था (टेक्स्टाइल इकोसिस्टिम) विकसित होत आहे, ‘कापसापासून फॅशनपर्यंत’ संपूर्ण मूल्य साखळी तयार केली जात आहे.

    छत्रपती संभाजीनगर : गेल्या १० वर्षांत भारताचे पहिले स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून विकसित झाले असून लवकरच ते देशाची ‘ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेइकल) राजधानी’ बनण्याच्या मार्गावर आहे.

    वाढवण बंदर : जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे आणि जगातील पहिल्या १० मोठ्या बंदरांपैकी एक असणारे वाढवण बंदर महाराष्ट्राला लॉजिस्टिक्समध्ये २० वर्षे पुढे नेईल, नाशिकसह किमान २० जिल्ह्यांना थेट जोडेल आणि वाहतूक खर्च कमी करेल.

    Defence Corridor: Sambhaji Nagar, Nashik – CM Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य