कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला होता. मात्र, केंद्रानं हा प्रस्ताव स्वीकारला नाही.Debashish Chakraborty accepted the post of Chief Secretary of the State
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ आज संपला असून नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला आहे. कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला होता. मात्र, केंद्रानं हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
संध्याकाळपर्यंत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर करण्यात न आल्यानं अखेर कुंटे यांना निवृत्त व्हावं लागलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला नव्या मुख्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.देबाशिष चक्रवर्ती यांना तीन महिने कार्यकाळ मिळणार आहे.ते फेब्रुवारी २०२२ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.