• Download App
    Death of three devotees after visiting Ekvira Devi, 9 serious including child

    एकविरा देवीच्या दर्शनाहून गेलेल्या तिघा भाविकांचा मृत्यू, चिमुकल्यांसह 9 जण गंभीर

    एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन भाविकांचा अपघातात मृत्यू झाला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ इको कारला भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा भाविकांना प्राण गमवावे लागले. नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. Death of three devotees after visiting Ekvira Devi, 9 serious including child


    विशेष प्रतिनिधी

    पालघर : एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन भाविकांचा अपघातात मृत्यू झाला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ इको कारला भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा भाविकांना प्राण गमवावे लागले. नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. आवंढाणी गावाच्या हद्दी सती माता हॉटेलच्या समोर मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजरात मार्गिकेवर भरधाव इको कारने कंटेनरला धडक दिली. दर्शन घेऊन घरी परत येत असताना हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.



    हेमंत तरे (वय 60 वर्ष) , राकेश तामोरे (वय 42 वर्ष) आणि सुषमा आरेकर (वय 32 वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावं आहेत. सर्व भाविक पालघरमधील दांडी येथील रहिवासी आहेत. अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    Death of three devotees after visiting Ekvira Devi, 9 serious including child

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पुन्हा उकळी; पवारांच्या जखमेवर मीठ चोळी!!

    ठाण्यात वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर कलम ३०७ ची कारवाई; एकनाथ शिंदे, राज ठाकरेंचा वृद्ध व्यक्तीशी संवाद

    Mumbai Pune bomb : मुंबई-पुणे महापौर कार्यालय, RSS मुख्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ई-मेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क