वृत्तसंस्था
पुणे : पुणे शहरात दिवसाढवळ्या कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 68 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.Daytime looting : Gang Of Thiefs are Arretested in Pune; Stolen goods also seized
अभिजीत उर्फ दादया अशोक रणदिवे (वय 21) , सतीश आण्णाजी केदळे (वय 32, दोघेही रा. हडपसर), आणि नोएल ऐलेन शबान (वय 20, रा. कोरेगाव पार्क ) अशी आरोपींची नावे आहेत.
हडपसर परिसरात टोळीने उच्छाद मांडला होता. कोयत्याचा धाक दाखवून दागिने चोरले होते. आरोपी हडपसरमधील म्हाडा कॉलनीत येणार असल्याची माहिती शाहिद शेख आणि शशिकांत नाळे यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून अभिजीत आणि सतीशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदार नोएलच्या मदतीने बंडगार्डन, हडपसर, वानवडी, कोंढवा, कोरेगाव पार्क ठाण्याच्या हद्दीत वाहनचालकांसह मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना लुटल्याची कबुली दिली.
आरोपींकडून 24 मोबाईल, दागिने जप्त
आरोपींकडून 24 मोबाईल, सोन्याचे दागिने, दुचाकी, टीव्ही असा मिळून 4 लाख 68 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
Daytime looting : Gang Of Thiefs are Arretested in Pune; Stolen goods also seized
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाची वाढ, सततचे संघर्ष आणि आपत्तींमुळे विस्थापितांच्या संख्येत विक्रमी वाढ
- Gadchiroli Naxal Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू, 13 नक्षलवादांचा खात्मा
- मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, येचुरी यांची सपशेल माघार
- ‘टिकटॉक’चे सीइओ झांग यिमिंग यांचा राजीनामा, अमेरेकिच्या दबावामुळे निर्णयाची चर्चा
- तब्बल १७० किलोमीटर लांबीचा प्रचंड हिमनग अंटार्क्टिका खंडापासून विलग, तापमानवाढीचा परिणाम