विशेष प्रतिनिधी
रायपूर – छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात शरण आलेल्या नक्षलवाद्यांसाठी पोलिसांकडून स्वतंत्र शहर विकसित केले जात आहे. देशातील हे अशा प्रकारचे पहिलेच शहर आहे. या शहरात नक्षलवाद्यांना कौशल्य प्रशिक्षणही दिले जाईल. Dantewada will get new city for naxalites
या शहराच्या उभारणीत शरणागत नक्षलवादीही योगदान देत आहेत. छत्तीसगडमधील सर्वाधिक नक्षलप्रभावित जिल्ह्यांत दंतेवाडाचा समावेश होतो. आजपर्यंत दंतेवाडात अनेक नक्षलवादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे, नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी पोलिसांकडून ‘तुमच्या घरी/गावी परत या’ ही मोहीम गेल्या वर्षीपासून राबविली जात आहे. आत्तापर्यंत ४०० नक्षलवाद्यांनी या मोहिमेतंर्गत शरणागती पत्करली आहे.
दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्या कल्पनेतून हे शहर साकारले जात आहे. दंतेवाडातील पोलिस लाईनसमोरील ३९ एकरमध्ये हे शहर उभारले जात आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात २१ एकर भागाचा विकास केला जाईल. एकूण १०८ वन बीएचके सदनिका असतील. याशिवाय, योग केंद्र, जीम, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र आदी सुविधाही या शहरात उभारल्या जातील. देशात शरण आलेल्या नक्षलवाद्यांसाठी प्रथमच स्वतंत्र शहर विकसित केले जात आहे. पुढील वर्षी २६ जानेवारीपर्यंत शहराचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे.
Dantewada will get new city for naxalites
महत्त्वाच्या बातम्या
- President Ram Nath Kovind Speech : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशवासीयांना संबोधन; कोरोना, कृषी, नवे संसद भवन, जम्मू-कश्मीरसह या मुद्द्यांचा उल्लेख
- World Youth Championships : पोलंडमध्ये भारतीय तिरंदाजांनी फडकावला तिरंगा, महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकले सुवर्ण
- सौर, पवन ऊर्जेच्या क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर, १ लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला
- सत्ता बदलताच नेपाळचा सूरही बदलला, नेपाळने म्हटले, चीन कधीही भारताची जागा घेऊ शकणार नाही