• Download App
    दलीतांची मते चालतात, पण बाबासाहेब नाहीत, पंडीत नेहरूंनी प्रचार करून डॉ. आंबेडकरांचा पराभव केला, रावसाहेब दानवे यांचा आरोप|Dalits vote required, but not Babasaheb, Pandit Nehru preachedand Defeated Ambedkar, alleges Raosaheb Danve

    दलीतांची मते चालतात, पण बाबासाहेब नाहीत, पंडीत नेहरूंनी प्रचार करून डॉ. आंबेडकरांचा पराभव केला, रावसाहेब दानवे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कॉँग्रेसला दलीतांची मते लागतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. बाबासाहेब भंडाºयात उभे राहिले होते. काँग्रेसने उमेदवार उभा केला. पंडित जवाहरलाल नेहरू प्रचाराला आले. बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेब दादरमध्ये लोकसभेला उभे राहिले. त्या ठिकाणीही काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला. बाबासाहेबांचा पराभव केला, असा हल्लाबोल रेल्वे राज्य मंत्री रावासाहेब दानवे यांनी केला.Dalits vote required, but not Babasaheb, Pandit Nehru preachedand Defeated Ambedkar, alleges Raosaheb Danve

    एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्यावरून शिवसेनेने नकार दिला आहे. यावर रावसाहेब दानवे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या धोरणावरही टीका केली. ते म्हणाले, शिवसेनेकडे दाखवण्यापुरतेही हिंदुत्व राहिले नाही. त्यामुळे ते वारंवार आम्ही हिंदुत्ववादी आहोत, असा उल्लेख करत सुटलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दलितांची मते लागतात, मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर चालत नाही. मुस्लिमांचीही मते हवीत पण एमआयएम पक्ष चालत नाही. ही काँंग्रेसची नीती आहे.



    दानवे म्हणाले, म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडाºयात उभे राहिले होते. काँग्रेसने उमेदवार उभा केला. पंडित जवाहरलाल नेहरू प्रचाराला आले. बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेब दादरमध्ये लोकसभेला उभे राहिले. त्या ठिकाणीही काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला. बाबासाहेबांचा पराभव केला. एका बाजूला दलितांचे मत लागतात, पण दलितांचा नेता लागत नाही. तसे एमआयएमचे मुसलमान मते लागतात, पण पक्ष लागत नाही. ही यांची नीती आहे, आता सर्वांनी ओळखून घेतले आहे, अशी जोरदार टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

    शिवसेनेकडे आता केवळ दाखवण्यापूरते ही हिंदुत्व राहिले नाही, म्हणून त्यांना सारखा तसा उल्लेख करावा लागतो की आम्ही हिंदुत्ववादी आहोत. मात्र शिवसेनेत आता भाजपला शह देण्याची क्षमता राहिली नाही असे सांगून शिवसेनेचा घसरता जनाधार लक्षात घेता पक्षाला वाईट दिवस येऊ नये म्हणून हे सुरू आहे. केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढवण्यासाठी चाललेला हा प्रकार आहे. यातून शिवसेना काही साध्य करू शकणार नाही.

    नेहमी एमआयएमही भाजपची बी टीम आहे अशी टीका होते. यावर बोलताना दानवे म्हणाले, बी नाही तर एमआयएम आमची झेड टीमही नाही. आमचा नंबर एकचा शत्रू काँग्रेस, दोन नंबरचा शत्रू एमआयएम आहे. जनतेचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रवादीने टाकलेली ही गुगली आहे. राष्ट्रवादी गेला बाजूला, काँग्रेस गेला बाजूला, शिवसेनाच आतून एमआयएमशी हातमिळवणी करतेय की काय, अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण शिवसेनेने आतापर्यंत जे जाहीरपणे म्हणले नाही, तेच केले आहे.

    Dalits vote required, but not Babasaheb, Pandit Nehru preachedand Defeated Ambedkar, alleges Raosaheb Danve

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस