Cyclone Tauktae : अरबी समुद्रात आलेल्या विनाशकारी तौकते चक्रीवादळामुळे समुद्रात अनियंत्रित होऊन वाहत असलेल्या एका नौकेतील स्वार झालेल्या 146 जणांना भारतीय नौदलाने वाचवले इतरांचा शोध अद्याप सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी सकाळी नौदलाने पी-81 विमानाला बचाव कार्यासाठी तैनात केले होते. शोध आणि बचाव कार्यासाठी हे नौदलाचे सागरी गस्त विमान आहे. Cyclone Tauktae Impact At Least 130 People Missing and 146 People Rescued By Indian Navy From The Barge P305
वृत्तसंस्था
मुंबई : अरबी समुद्रात आलेल्या विनाशकारी तौकते चक्रीवादळामुळे समुद्रात अनियंत्रित होऊन वाहत असलेल्या एका नौकेतील स्वार झालेल्या 146 जणांना भारतीय नौदलाने वाचवले इतरांचा शोध अद्याप सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी सकाळी नौदलाने पी-81 विमानाला बचाव कार्यासाठी तैनात केले होते. शोध आणि बचाव कार्यासाठी हे नौदलाचे सागरी गस्त विमान आहे.
यापूर्वी, सोमवारी एफकान्स कंपनीच्या मुंबई हाय ऑईल फील्डमध्ये ऑफशोअर उत्खननासाठी तैनात करण्यात आलेल्या दोन नौका अँकरमधून घसरल्या आणि त्या समुद्रात भरकटू लागल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर नौसेनेने तीन फ्रंटलाइन युद्धपोत तैनात केले होते. भरकटलेल्या दोन नौकांमध्ये 410 जण स्वार होते.
या दोन्ही बार्जच्या मदतीसाठी आयएनएस कोलकाता, आयएनएस कोची आणि आयएनएस तलवार यांना पाठवण्यात आले होते. यानंतर समुद्रातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत पी305 वरून एकूण 146 जणांना वाचविण्यात यश आले, ”अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने मंगळवारी सकाळी दिली. इतरांना वाचवण्यासाठी शोध आणि बचाव (एसएआर) अभियान रात्रभर सुरू होते.
ते म्हणाले, “दुसर्या घटनेत आयएनएस कोलकाताने पोत वरप्रभाच्या ‘लाइफ रॅफ्ट’वरूनही दोन जणांना वाचवले आणि पी 305 मधील क्रू मेंबर्सना वाचवण्यासाठी आयएनएस कोचीबरोबर शोध आणि बचाव कार्य सुरू केले. हवामान खात्याने सांगितले की, गुजरात किनारपट्टीवर जोरदार धडक दिल्यानंतर तौकते चक्रीवादळ आता दुर्बल झाले आहे. त्याचवेळी गुजरातमधील दोन लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्रात तौकतेमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Cyclone Tauktae Impact At Least 130 People Missing and 146 People Rescued By Indian Navy From The Barge P305
महत्त्वाच्या बातम्या
- Congress Toolkit Leaked : ईद आनंदोत्सव, तर कुंभ म्हणजे सुपरस्प्रेडर, काँग्रेसच्या टूलकिटमध्ये मोदी सरकार व हिंदूंना बदनाम करण्याची रूपरेषा
- Congress Toolkit Exposed : महामारीच्या आडून काँग्रेसचा देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न, टूलकिटचा भाजपकडून पर्दाफाश
- हरियाणातील मुस्लिम युवकाच्या मृत्यूला शरजील उस्मानीने दिला धार्मिक अँगल, म्हणाला- जय श्रीराम म्हणणारे टेररिस्ट!
- Narada Case : कोलकाता हायकोर्टाने ममता बॅनर्जींना फटकारले, म्हणाले- ‘ही असाधारण स्थिती, गर्दीची दडपशाही चालणार नाही!’
- Narada Case : ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या चार नेत्यांच्या जामिनाला कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थगिती