• Download App
    Currently the best time and opportunity to invest in the field of AI; Maharashtra is ready for leadership in the field of AI! AI च्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सध्या सर्वोत्तम काळ आणि संधी; AI क्षेत्रात नेतृत्वासाठी महाराष्ट्र सज्ज!!

    AI च्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सध्या सर्वोत्तम काळ आणि संधी; AI क्षेत्रात नेतृत्वासाठी महाराष्ट्र सज्ज!!- मुंबई टेक वीक २०२६ चे उद्घाटन

    Maharashtra

     

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘मुंबई टेक वीक 2026’ चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राज् एआय व्हिजन’ या विषयावर संवाद साधला.Currently the best time and opportunity to invest in the field of AI; Maharashtra is ready for leadership in the field of AI!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र एआय क्षेत्रात नेतृत्व करेल. राज्य सरकारने ₹10,000 कोटींची एआय गुंतवणूक, 1,50,000 रोजगारनिर्मिती, 6 ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि विशेष ‘एआय इनोव्हेशन क्षेत्रे’ उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच, एआय क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांना अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकार “कम्प्युट-ॲज-अ-सर्व्हिस” सुविधा विकसित करत आहे. उच्च क्षमतेच्या कम्प्युटिंग सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि नवकल्पनांना अधिक गती मिळावी यासाठी 2000 जीपीयू उपलब्ध करून देण्यात येत असून, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर राज्य सरकार विशेष भर देत आहे.



    – महाराष्ट्र अग्रेसर

    सरकार केवळ धोरणात्मक चौकट तयार करते, पण प्रत्यक्षात मजबूत स्टार्टअप परिसंस्था उभारण्याचे काम संस्थापक आणि उद्योजकच करतात. डिसेंबर 2022 मध्ये टेक उद्योजकांच्या संघटनेची संकल्पना प्रथम मांडण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या कार्यातील ऊर्जा आणि दूरदृष्टी पाहून हा उपक्रम भविष्यात मोठा होईल, हा त्यावेळी वाटलेला विश्वास आता खरा ठरतो आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता दरवर्षी अधिकाधिक संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्या महाराष्ट्राशी जोडल्या जात आहेत. सलग 3 वर्षे महाराष्ट्र गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरत आहे.

    – AI मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

    देशभरातून आणि विदेशातून मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना उद्देशून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन करत, तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम काळ असून महाराष्ट्र ही सर्वोत्तम कार्यक्षेत्र आहे. राज्यात सक्षम आणि गतिमान परिसंस्था निर्माण झाली आहे, असे सांगितले. महाराष्ट्रासाठी कार्य करा, भारतासाठी योगदान द्या आणि जगासाठी नवकल्पना घडवा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राज्य शासन केवळ इनक्युबेशन आणि ॲक्सेलरेशनपुरते मर्यादित नसून, ‘फंड ऑफ फंड्स’च्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही उपलब्ध करून देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास सज्ज आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

    – सरकारच्या विभागांमध्ये AI चा वापर

    राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले “महा-विस्तार” ॲप हे एक प्रभावी ‘वन स्टॉप सोल्युशन’ ठरत आहे. या ॲपला भारत एआय परिषदेत केंद्र सरकारकडून देशातील सर्वोत्तम शेतकरी उपाय म्हणून गौरविण्यात आले आहे. आता त्याच धर्तीवर ‘इंडिया-विस्तार’ ही संकल्पना विकसित करण्यात येत आहे. गुन्हे तपास आणि न्यायप्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘क्राईम ओएस’ या प्लॅटफॉर्ममुळे तपास, आरोपपत्र तयार करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. तसेच, बांधकाम परवानगी प्रक्रियेत एआय आधारित प्रणालीमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

    ५० AI इंजिन विकासाचे उद्दिष्ट

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वैद्यकीय विमा योजनांमधील गैरव्यवहार शोधणे, एचआर स्टॅकद्वारे शासकीय मनुष्यबळ व्यवस्थापन सुधारणे, वाहतूक नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि देखरेख व्यवस्था यांसारख्या विविध क्षेत्रांतही ‘एआय’चा प्रभावी वापर सुरू आहे. राज्य सरकारने विविध विभागांसाठी 50 एआय इंजिन विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

    – एथिकल AI

    एआयच्या वेगवान विस्तारासोबत ‘डीपफेक’, डेटा सुरक्षा आणि विश्वासार्हता यांसारखी आव्हानेही निर्माण होत आहेत. त्यामुळे ‘एथिकल एआय’ हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. एआय सर्वांसाठी उपलब्ध असले पाहिजे; त्यावर केवळ मोठ्या कंपन्यांचा विशेषाधिकार राहता कामा नये. एमएसएमईंनाही त्याचा लाभ मिळायला हवा. तसेच, एआयमध्ये मानवी हस्तक्षेप आणि मानवी मूल्ये केंद्रस्थानी असणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

    Currently the best time and opportunity to invest in the field of AI; Maharashtra is ready for leadership in the field of AI!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासाठी जलसंधारणाच्या दिशेने मोठे पाऊल; दोन्ही ठिकाणच्या विशेष पथकाला फडणवीस सरकारची मंजुरी

    राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे; शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!

    विधान परिषदेवर एकही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर; काँग्रेस ८, राष्ट्रवादी (शप) ३, ठाकरे सेना ४!!