विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशभरात चर्चेत असलेल्या मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता वेगळं वळण लागल आहे. या प्रकरणात NCB तपास अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने आरोप लावले. त्यानंतर आता भाजपा नेते मोहित कंभोज भारतीय यांनी या कारवाईबाबत मोठा दावा केला आहे.Cruise Party: A new turn for the cruise party
मोहित भारतीय यांनी ट्विट करत क्रुझवरील पार्टीत(Cruise Rave Party) राष्ट्रवादी(NCP) मंत्र्याची मुलगी आणि राष्ट्रवादीच्याच ज्येष्ठ मंत्र्याचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत उपस्थित होता.
मग शिप बोर्डिंग होण्यापूर्वीच ते पळून का गेले? असा सवाल मोहित भारतीय(BJP Mohit Bhartiya) यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आर्यन खान प्रकरणात आणखी किती जण सहभागी होते यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
मलिकांचा समीर वानखेडेंवर आरोप
क्रुझवरील छापेमारीवेळी(Mumbai Cruise Drugs Case) एक दाढीवाला आणि त्याची गर्लफ्रेंड उपस्थित होती. तो दाढीवाला कोण? असा सवाल करत वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा दावा मलिकांनी केला. त्याला सोडून का देण्यात आले? असा सवालही मलिकांनी विचारला होता. मात्र आता यानंतर क्रुझवर राष्ट्रवादी मंत्र्यांची मुलगी आणि मुलगा उपस्थित असल्याचा दावा भाजपाच्या मोहित भारतीय यांनी करुन खळबळ माजवली आहे. त्यामुळे हे मंत्री कोण याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.
Cruise Party: A new turn for the cruise party
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नको , कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत
- कोरोना लसीकरणात मागास जिल्ह्यांमध्ये ‘हर घर दस्तक’ केंद्र सुरू होणार
- शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून केली ७५ कोटींची मागणी , मानसिक छळाचा केला आरोप
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत; सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन