• Download App
    शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्यासह ८० धारकऱ्यांवर गुन्हा|Crime against 80 DHARKARI including Sambhajirao Bhide of Shiv Pratishthan

    शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्यासह ८० धारकऱ्यांवर गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    कराड : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करीत जमाव जमवून कोरोनाच्या निर्देश व आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे-गुरुजी यांच्यासह सुमारे ८० धारकऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Crime against 80 DHARKARI including Sambhajirao Bhide of Shiv Pratishthan

    बेकायदा जमाव जमवून रॅली काढली आणि मंदिरात प्रवेश बंदी असतानाही मंदिर उघडून प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे, सागर आमले, अजय पावस्कर, केदार डोईफोडे, प्रवीण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकर यांच्यासह अन्य धारकऱ्यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीवर राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पायी दिंडी सोहळा काढण्यास मनाई करण्यात आली असून वारीला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे.

    शासनाने बंडातात्या यांच्यासह वारकºयांना वारीसाठी परवानगी द्यावी, या मागणीला समर्थन देत सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे कºहाडातील दत्त चौकात आले. त्यावेळी त्यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे ७० ते ८० धारकरी बंद असलेले साईबाबा मंदीर उघडून आत बसले.

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत परवागनी न घेता जमाव जमवून रॅली काढली. यावेळी रॅलीत सहभागी धारकºयांनी विना मास्क शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचा भगवा झेंडा हातात घेवून दत्त चौक ते प्रशासकीय इमारत येथे घोषणाबाजी करत पायी चालत जात तहसिलदार यांना निवेदन दिले.

    Crime against 80 DHARKARI including Sambhajirao Bhide of Shiv Pratishthan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    CM Fadnavis : डॉक्टर आत्महत्येप्रकरणी CM फडणवीसांनी माजी खासदारांवरील आरोप फेटाळले; रणजितसिंह निंबाळकरांचा काही संबंध नाही

    दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फलटण मधून ग्वाही!!

    Pankaja Munde : मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही, माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण