विशेष प्रतिनिधी
जालना :महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहिल हे सांगता येत नाही पण जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही लाट कायम राहिल असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. जालना येथील पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी हे वक्तव्य केलं आहे. COVID THIRD WAVE: The third wave begins in Maharashtra – Union Health Minister Mansukh Mandvi’s review meeting – Rajesh Tope’s presence
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला राजेश टोपे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र असो किंवा इतर राज्यं सध्या क्वारंटाईनचा कालावधी हा सात दिवसांचाच ठरवण्यात आला आहे. कुठे दहा दिवस, कुठे पाच दिवस असा कुठलाही प्रकार नाही.
त्याचसोबत काही ठिकाणी आपले असेही प्रश्न आहेत की शाळेच्या बाबतीत आपण निर्णय घेतला आहे की शाळा बंद ठेवायच्या. त्यामध्ये ICMR चे डायरेक्टर जनरल यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही हे सांगितलं की जिथे पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्यावर जात असेल तिथे असा निर्णय घ्यावाच लागेल. आपला पॉझिटिव्हिटी रेट 15.5 टक्के आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
लोकांना संसर्गापासून रोखणं हाच आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे निर्बंध लावण्यात आले आहेत. मला या निमित्ताने जनतेला आणि विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना हे सांगायचं आहे की शाळा बंद झाल्या ही बाब सकारात्मक दृष्टीने बघा. कोरोना रूग्णवाढ हा काही कायम राहणारा विषय नाही.
COVID THIRD WAVE: The third wave begins in Maharashtra – Union Health Minister Mansukh Mandvi’s review meeting – Rajesh Tope’s presence
महत्त्वाच्या बातम्या
- रयतमधील गैरकारभार,भ्रष्टाचाराचा शिवसेनेच्या आमदाराकडून भांडाफोड, बारामतीतील एक जण आहे ‘कलेक्टर’, शरद पवारांनी अध्यक्षपद सोडविण्याची मागणी
- ममता गोव्यात येऊन राजकीय पायरोवा करू शकतात, पण शिवसेना – राष्ट्रवादी का नाही करू शकत??
- खलिस्थानवाद्यांनी घेतली पंतप्रधानांचा ताफा अडविल्याची जबाबदारी, चौकशी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही धमकी
- उत्तर प्रदेशात भाजपच राखणार सत्ता, पंजाबमध्ये आपचा उदय, कॉँग्रेसचा सगळ्याच राज्यांत सुफडासाफ