विशेष प्रतिनिधी
महाड : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामिन मंजूर करण्यात आला. महाविकास आघाडीच्या सूडबुध्दीला न्यायालयाने चपराक दिल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जल्लोष केला. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राणे यांच्या वकीलांनी तातडीने जामिनासाठी अर्ज दाखल केला. Court grants bail to Narayan Rane
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने राणे यांच्या विरोधात राज्याच्या विविध भागांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्र्वर तालुक्यातील गोळवली येथून ताब्यात घेण्यात आले होते.
त्यानंतर त्यांना रायगड पोलिसांनी ताब्यात घेत राणे यांना महाड पोलिस ठाण्यात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आणले. त्यानंतर पावणेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांना महाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला.
न्यायालयाने सुमारे ५५ मिनीटे दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले. नारायण राणे यांचे वकील युक्तिवाद करताना म्हणाले, राणे यांच्यावर राजकीय सुडबुध्दीने कारवाई करण्यात आली आहे.राणे यांच्या विरोधात लावण्यात आलेली कलम चुकीची आहेत. त्यांनी दाखल केलेली तपासाची कारण देखील चुकीची आहेत.
राणेंना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी नोटीस दिली नाही.राणेंनी पत्रकार परिषदेत जाहीर वक्तव्य केल्याने त्यामागे कोणतही कट कारस्थान नाही. राणे यांना वैद्यकीय कारणांनी जामीन द्यावा. सरकारी वकीलांनी युक्तीवाद करताना म्हटले की,राणे हे केंद्रीय मंत्री आहेत ते एक जबाबदार व्यक्ती आहेत. मग ते बेजबाबदारपणे कसे वागले. राणे यांनी केलेल्या वक्तव्या मागे कट आहे. त्यामुळे त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली.मात्र, न्यायालयाने राणे यांच्या वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य धरून त्यांना जामीन मंजूर केला.
दरम्यान, नाशिक आणि पुणे पोलिस राणे यांचा ताबा मागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, न्यायालयाकडून पोलीसांना चपराक बसल्याने पुणे आणि नाशिक पोलीसांनीही ताबा मागितला नाही.
Court grants bail to Narayan Rane
महत्त्वाच्या बातम्या
- घसरलेली जीभ आणि उगारलेले हात…!!
- ममता बॅनर्जी केंद्राविरोधात आक्रस्ताळ्या उड्या मारत राहणार…?? की उद्धव ठाकरे यांची “वाट” पकडणार…??
- दिशा सालियनच्या मारेकरी मंत्र्याला आत मध्ये घालू; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची नाव न घेता उघड धमकी
- पुण्यामध्ये पोटच्या दोन मुलांकडून आईचा छळ; कौटुंबिक अत्याचाराचा वेगळा धक्कादायक प्रकार