• Download App
    परमवीर सिंगांना फरार जाहीर करण्यास कोर्टाची मान्यता; 30 दिवसांत हजर झाले नाहीत तर संपत्ती करणार जप्त|Court approves declaration of Paramvir Singh as absconding; If not present within 30 days, the property will be confiscated

    परमवीर सिंगांना फरार जाहीर करण्यास कोर्टाची मान्यता; 30 दिवसांत हजर झाले नाहीत तर संपत्ती करणार जप्त

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार चालकांकडून शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात बदली करण्यात आलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे अजूनही पोलिसांसमोर अथवा न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्याची मुभा कोर्टाने मुंबई पोलिसांना दिली आहे.Court approves declaration of Paramvir Singh as absconding; If not present within 30 days, the property will be confiscated

    त्याच बरोबर परमवीर सिंग हे येत्या 30 दिवसांमध्ये पोलिसांसमोर अथवा न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे विशेष सरकारी वकील जगताप यांनी स्पष्ट केले आहे.



    परमवीर सिंग यांच्या संदर्भातील याचिकेची सुनावणी आज न्यायालयात झाली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना परमवीर सिंग यांना फरार जाहीर करण्याची मुभा दिली.आता पोलीस परमवीर सिंग यांना “वॉन्टेड आरोपी” असे जाहीर करून त्यांना फरार देखील घोषित करू शकतात, असे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

    त्याच बरोबर पुढच्या 30 दिवसांमध्ये परमवीर सिंग यांना शोधून अटक करण्यात आली नाही किंवा ते स्वतःहून पोलिसांसमोर अथवा न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यानंतर परमवीर सिंग यांची ज्ञात संपत्ती जप्त करण्याची कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    Court approves declaration of Paramvir Singh as absconding; If not present within 30 days, the property will be confiscated

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!