• Download App
    वार-पलटवार : राऊत म्हणाले- शिंदे गटाचे काही आमदार संपर्कात, शिंदे म्हणाले- राऊतांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या!|Counterattack Raut said - some MLAs of Shinde group in contact, Shinde said - let Raut dream of power transfer!

    वार-पलटवार : राऊत म्हणाले- शिंदे गटाचे काही आमदार संपर्कात, शिंदे म्हणाले- राऊतांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. सत्तापरिवर्तन होऊ शकते. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, राऊत हे स्वप्न पाहत असतात, त्यांना स्वप्नात राहू द्या. राज्यात दोन्ही सदनांतही दोन तृतीयांश बहुमत आम्हाला आहे. आमचे सरकार भक्कम आहे.’Counterattack Raut said – some MLAs of Shinde group in contact, Shinde said – let Raut dream of power transfer!

    काय म्हणाले राऊत?

    ‘उद्या महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन झाले तर यात आश्चर्य वाटून घेऊ नका. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल,’ असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात खूप गोंधळ आहे. शिंदे स्वत:ला शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणतात, तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाण्याची गरज नसते.



    अमित शहासुद्धा मातोश्रीवर येत होते, ते एक तेव्हाचे नाते होते. पण ५ वेळा मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जावे लागते, ते त्यांचे बस्तान मुंबईतून हलवतात की काय अशी स्थिती आहे. महिना झाला तरी दोघांचेच कॅबिनेट असून ते बेकायदेशीर निर्णय घेत आहेत. त्यात महाराष्ट्र आणि शिंदे यांच्या गटाला शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवले, याचे आत्मचिंतन करावे लागेल.

    काय म्हणाले मुख्यमंत्री?

    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘राऊतांना जे बोलायचे ते बोलू द्या, त्यांना स्वप्नात राहू द्या, पण आम्ही राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ. ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होते, त्यासाठी आमची दिल्लीवारी आहे. त्याचे काम सुरू असून कायदेविषयक बाबींबाबत बैठका घेतल्या. राज्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम सरकार करते, सर्वोच्च न्यायालयाचेही मी आभार मानतो.’

    मुख्यमंत्री म्हणाले, ‘मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करणार आहोत. आम्ही सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेल दरकपात, कर्ज प्रकरणे व प्रकल्पावर आम्ही काम सुरू केले आहे.’

    काय म्हणाले अजित पवार?

    एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खा. संजय राऊत यांनाही टोला लगावला. कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत हे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत अजित पवार यांनी खा. संजय राऊतांना टोला लगावला. महिना होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार न होणे हे चांगले नाही.

    १६५ आमदारांचा पाठिंबा आहे असे म्हणता, मग मंत्रिमंडळ विस्तारास तुम्हाला कुणी अडवले, असा सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला केला. तसेच पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता अजित पवारांनी एवढा उशीर का लावला, अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले, ‘आम्ही देखावा करत नाही, प्रत्यक्ष मदत करतो. बावनकुळेंनी माध्यमांपुढे बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.’

    Counterattack Raut said – some MLAs of Shinde group in contact, Shinde said – let Raut dream of power transfer!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस