विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आले होते .यावेळी बोलताना किरीट सोमैय्या यांनी महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका केली.मेळाव्यानंतर बोलताना किरीट सोमय्या यांनी कोव्हिड काळात भ्रष्टाचारात शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केला आहे ,मंत्र्यांचा घोटाळा मी उघडकीस आणला आहे , असे सांगितले. Corruption in the Covid period Shiv Sena’s record: Somaiya
आता या मंत्र्यांच्या परिचित व्यक्ती आणि एक अधिकारी याच्या कंपनीला मुंबई महापालिकेत कोव्हिड काळात कशा पद्धतीने १०० कोटीचे कोव्हिडं काँट्रॅकक्ट मिळाले हे येत्या मंगळवारी जनतेसमोर ठेवणार आहे तर पुढच्या महिनाभरात आणखी पाच किस्से एमएमआर रिजनमधील महापालिकामधील अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यामधील पार्टनरशिप लोकांसमोर ठेवणार असल्याचे सांगितले.
नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या समीर वानखेडे जन्मदाखल्याचे कोणतेही पुरावे मुंबई महापालिकेकडे नाही अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यानी माहितीच्या अधिकारात दिल्याचे सोमैय्या यांनी सांगितले. त्यांना कुठून तरी झेरॉक्स मिळाली ती त्यानी दाखवली.
सरकार कोमात : किरीट सोमय्या
एसटी कर्मचाऱ्याच्या संपाबाबत किरीट सोमय्या याना प्रश्न विचारला असता त्यांनी हे सरकार कोमात जातंय याची काळजी आहे अशी टीका केली पुढे बोलताना वीज गायब होतेय ,एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत ,अनिल परब रोज म्हणतात एसटी सुटली एसटी गावाला निघाली पण एसटी कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला.
- कोव्हिड काळात भ्रष्टाचारात शिवसेनेचे रेकॉर्ड
- मुंबई महापालिकेचा १०० कोटीचा घोटाळा
- पुढच्या महिनाभरात आणखी पाच किस्से
- अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यामधील पार्टनरशिप
- एसटीचा संप, सरकार कोमात
Corruption in the Covid period Shiv Sena’s record: Somaiya
महत्त्वाच्या बातम्या
- Narendra Modi in Varanasi : काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर
- CONGRATULATIONS INDIA : २१ वर्षांनंतर भारताला ‘Miss Universe’चा किताब ! हरनाज कौर संधूनं पटकावलं विजेतेपद
- Omicron Case In Nagpur : नागपूरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण महाराष्ट्रात १८ रुग्ण
- Republic Day : प्रजासत्ताक दिनी पाच मध्य आशियातील देशांचे नेते भारताचे पाहुणे …
- सामूहिक विनाशाचे हत्याकर म्हणून अमेरिकेकडून लोकशाहीचा वापर, चीनची सडकून टीका